२०१४ मध्ये श्वेता हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये एका सेक्स स्कँडलमध्ये श्वेता बासू अडकली होती. यामुळे दोन महिने तिला रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले होते. पुढे हैदराबाद सेशन कोर्टने तिला क्लिनचीट दिली होती. या घटनेने श्वेताच्या करिअरवर मोठा परिणाम झाला होता. सेक्स स्कँडलमध्ये नाव आल्यानंतर पुढची दोन-एक वर्ष श्वेताना बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले होते. २०१७ मध्ये ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केला होता. त्यानंतर करिअरमध्ये रुळल्यानंतर श्वेता बॉयफ्रेंड रोहित मित्तलसह लग्नबंधनाथ अडकली.  

दोघेही फिल्म इंडस्ट्रीशी सबंधित आहे. या दोघांनाही जवळ आणण्यात दिग्दर्शक अनुराग कश्यपची मोठी भूमिका होती. एका शॉर्टफिल्ममध्ये श्वेता आणि रोहित यांनी एकत्र काम केले होते. पुढे त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर प्रेम. श्वेता आणि रोहितच्या जवळच्या मित्रांचे मानाल तर सर्वप्रथम श्वेतानेच रोहितला प्रपोज केले होते. गोव्यात तिने रोहितला प्रपोज केले.

 

यानंतर रोहितने पुण्यात श्वेताला लग्नाची मागणी घातली होती. 13 डिसेंबर 2019 रोजी रोहितसह लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली. मात्र लग्नाला वर्षच उलटले असतानाचा दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वी पतीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. आता श्वेताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत श्वेताने पती रोहित मित्तलपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. ‘रोहित मित्तल आणि मी दोघांनीही परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक महिन्यानंतर एकमेकांच्या भल्यासाठी आम्ही या निर्णयाप्रत पोहोचलो आहोत.

सर्व पुस्तके केवळ मुखपृष्ठावरून वाचावीत, अशी नसतात. याचा अर्थ हा नाही की, ती पुस्तक वाईट असतात. पण काही गोष्टी अर्धवट सोडलेल्याच ब-या. मला इतके यादगार क्षण दिल्याबद्दल रोहित तुझे आभार. तुझे भावी आयुष्य आनंददायी होवो, तुझीच चिअरलीडर’,असे तिने लिहिले होते.

Web Title: When Actress Shweta Basu was arrested for being involved in a prostitution racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.