What’s Karan Johar Upto? Is he planning something for his birthday-ram | वाढदिवसाच्या दिवशी करण जोहर देणार का सरप्राईज?

वाढदिवसाच्या दिवशी करण जोहर देणार का सरप्राईज?

ठळक मुद्दे करणने सर्वप्रथम दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमात काम केले होते. यात तो अगदीच छोट्याशा भूमिकेत दिसला होता.

करण जोहर त्याच्या स्टाईलसाठी ओळखला जातो. 5 मे रोजी करणने एक पोस्ट केली होती. करणने आपल्या पांढ-या केसांमधील लूकचा एक नवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यासोबत त्याने मजेदार कॅप्शन लिहिले होते. विशेष म्हणजे त्याच्या या पोस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही तितक्याच मजेदार कमेंट केल्या होत्या.
‘माझी अ‍ॅक्टिंग कोरोना व्हायरसपेक्षाही धोकादायक आहे, हे मला माहित आहे. पण तरीही दुसरी संधी शोधण्यात काहीही चुकीचे नाही. तेव्हा सर्व कास्टिंग डायरेक्टर्स, रिस्क घेणारे मेकर्स आणि क्रिटीक्स शिवाय प्रेक्षकहो, मी येथे एक घोषणा करतोय की, आता मी पित्याच्या भूमिकांसाठी तयार आहे, ’ असे करणने लिहिले होते.

करणने हा फोटो व पोस्ट शेअर करताच बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्यावर मजेदार कमेंट दिल्या होत्या. अनिल कपूर यात आघाडीवर होता. ‘मेरे पेट पर लात क्यों मार रहे हो सर,’ असे अनिल कपूरने करणच्या या पोस्टवर कमेंट करताना लिहिले होते़. तर  टीव्हीची क्वीन एकता कपूर हिने मात्र करणला चक्क आॅफर दिली होती.   ‘माझ्याकडे एक मालिका आहे़ ऋषभ बजाजचे केस पांढरे आहेत आणि तो खूप हॉटही आहे़. आम्ही सर्रास या कॅरेक्टरचा चेहरा बदलतो. तेव्हा टीव्हीवर ये, ’ असे एकताने लिहिले होते. कोरिओग्राफर फराह खान हिने मात्र करणची चांगलीच फिरकी घेतली होती. ‘तुला मेंटेन करणे तर हिरोईनपेक्षाही महागात पडेल, ’ असे तिने लिहिले होते.

अनेकांच्या मते, या पोस्टद्वारे लिहिण्यामागे करणने काही सूचक संकेत दिले होते. होय, करणच्या जवळच्या लोकांच्या मते, उद्या 25 मे रोजी करणचा वाढदिवस आहे. त्यापूर्वी करण स्वत:वर अनेक प्रयोग करतोय. करणचे लॉकडाऊन काळातील अनेक व्हिडीओ बघा. त्यात करणची मुले दिसलीत. पण करण कुठेही नाही. आता तो वडिलांच्या भूमिकेची तयारी करतोय की आणखी तरूण दिसण्यासाठी काही नवी शक्कल लढवतोय, हे फक्त त्यालाच ठाऊक. उद्या करणच्या वाढदिवशी याबद्दलचे काही सरप्राईज मिळते का ते पाहूच.
 करणने सर्वप्रथम दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमात काम केले होते. यात तो अगदीच छोट्याशा भूमिकेत दिसला होता. यानंतर ‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमात त्याने विलेनची भूमिका साकारली होती. हा सिनेमा दणकून आपटला होता. शिवाय करणच्या या चित्रपटातील भूमिकेवरही बरीच टीका झाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: What’s Karan Johar Upto? Is he planning something for his birthday-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.