what is the true reason behind the breakup between deepika padukone and ranbir kapoor | प्रेमात आकंठ बुडालेले असताना दीपिका आणि रणबीरचे अचानक झाले होते ब्रेकअप, कारण वाचून व्हाल हैराण

प्रेमात आकंठ बुडालेले असताना दीपिका आणि रणबीरचे अचानक झाले होते ब्रेकअप, कारण वाचून व्हाल हैराण

ड्रग्स प्रकरणात नाव आल्यामुळे दीपिका पादुकोण सध्या चर्चेत आहे. तिला सोशल मीडियावर सुद्धा ट्रोल करण्यात येते आहे. एनसीबी दीपिकाला चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे दीपिका पादुकोण ऑफिशियल स्टेटमेंट काढून स्वत:ची बाजू मांडण्याची देखील शक्यता आहे. 

आज आम्ही तुम्हाला दीपिका आणि रणबीर कपूरच्या लव्हस्टोरीबदल सांगणार आहोत.. दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर रिलेशनशीपमध्ये होते दे सगळ्या जगाला माहिती आहे. दीपिका आणि रणबीरची लव्हस्टोरी काही वर्षांपूर्वीच संपली. मात्र आजही जेव्हा बॉलिवूडमधील लव्हस्टोरीचा उल्लेख होतो तेव्हा त्या लिस्टमध्ये दीपिका आणि रणबीरचे नाव जरुर येते. दीपिका पादुकोण रणबीरच्या प्रेमात आकंठ बुडाली होती तिने मानेवर तिच्या नावाचा टॅटूदेखील काढला होता. 

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, दीपिकाला रणबीरची मुलींसोबतची मैत्री पसंत नव्हती. त्यावेळी अनेक मुलींसोबत रणबीरचे नाव जोडण्यात आले. ज्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. रिपोर्टनुसार दीपिकाला रणबीर लग्न करणार होते त्याच दरम्यान त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. एका मुलाखती दरम्यान दीपिका म्हणाली होती की, जेव्हा मी रणबीर कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये होते त्यावेळी मला अनेकांनी तो तुला धोका देतोय हे सांगितले होते. मला स्वत:ला ही हे माहिती होते. मात्र मला त्याला एक संधी द्यायची होती. मग एकदिवस मी त्याला रंगेहाथ पकडले. मग मी विचार केला अशा रिलेशनशीप पेक्षा सिंगल राहिलेले काय वाईट आहे. ब्रेकअपनंतरही दीपिका आणि रणबीरमध्ये आजही चांगली मैत्री आहे. दोघांनी ये जवानी है दिवानी आणि तमाशा सारख्या सिनेमात ब्रेकअप नंतरही एकत्र काम केले आहे. 

Drugs case: दीपिका व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये विचारते, 'माल आहे का?' Hash ना?, गांजा नाही, वाचा पूर्ण चॅट

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: what is the true reason behind the breakup between deepika padukone and ranbir kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.