What happened was that Karan Johar and Kareena Kapoor had not talk with each other for 9 months | असं काय घडलं होतं की करण जोहर आणि करीना कपूरमध्ये ९ महिने होता अबोला

असं काय घडलं होतं की करण जोहर आणि करीना कपूरमध्ये ९ महिने होता अबोला

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि दिग्दर्शक करण जोहर आज भलेही चांगले मित्र आहेत, पण काही वर्षांपूर्वी ते दोघे एकमेकांशी अजिबात बोलतही नव्हते. करण जौहरने नुकताच खुलासा केला की त्याने करीना कपूरसोबत ९ महिने अबोला धरला होता.

करणने त्याच्या 'द अनसुटेबल बॉय' या पुस्तकात करीनासोबतचा एक किस्सा सांगितला आहे. त्याने म्हटलं, 'करिनासोबत माझी सगळ्यात मोठी अडचण तेव्हा झाली होती जेव्हा तिने चित्रपटासाठी खूप जास्त मानधन मागितलं होतं. त्यावेळेस आम्ही खूप वाईट परिस्थितीत होतो. 'मुझसे दोस्ती करोगे' नुकताच प्रदर्शित झाला होता आणि आदित्य चोप्रा यांच्या दिग्दर्शनात बनलेला तो एक फ्लॉप चित्रपट होता. 


करण जोहरने पुढे सांगितले की, त्यानंतर आम्ही करीनाला 'कल हो ना हो' चित्रपटातील मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. मात्र करीनाने या चित्रपटासाठी शाहरुख खानला मिळणाऱ्या मानधना इतक्याच पैशांची मागणी केली. जी आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो. मी तिला सॉरी म्हणालो आणि घरी आलो. घरी गेल्यावर तिला पुन्हा एकदा फोन केला होता पण, तिने फोन उचलला नाही. त्यानंतर चित्रपटात प्रीती झिंटाला घेण्यात आले. या प्रकरणानंतर जवळपास नऊ महिने आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो.'


माझे वडील यश जोहर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होते, तेव्हा करीनाने मला फोन केला. करण म्हणाला की, तो ऑगस्टचा महिना होता. आम्ही नऊ महिने एकमेकांशी बोललो नव्हतो. तिने फोन केला आणि म्हटले की मी यश अंकलबद्दल ऐकले. ती फोनवर खूप भावूक झाली होती. ती म्हणाली की, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मला माफ कर मी संपर्कात नव्हते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: What happened was that Karan Johar and Kareena Kapoor had not talk with each other for 9 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.