ठळक मुद्दे‘पल पल दिल के पास’ हा चित्रपट एक लव्हस्टोरी आहे. करण देओलसोबत सहर बाम्बा ही सुद्धा या चित्रपटातून डेब्यू करतेय.

बॉलिवूड अभिनेता व दिग्दर्शक सनी देओल सध्या ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटातून सनीचा मुलगा करण देओल बॉलिवूड डेब्यू करतोय. विशेष म्हणजे, हा चित्रपट सनीने स्वत: दिग्दर्शित केला आहे. ‘पल पल दिल के पास’ च्या प्रमोशनसाठी करण व सनी या बापलेकांनी ‘नच बलिए 9’मध्ये हजेरी लावली. यावेळी सनीने असा काही खुलासा केला की, सगळेच अवाक् झालेत. होय, आपल्या पहिल्या डेटवर काय केले होते, हे सनीने सांगितले.

शोचा होस्ट मनीष पॉल याने सनी आणि करण यांना एक आगळा-वेगळा गेम खेळवला. या गेममध्ये दोघांनीही काही प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. याच गेममध्ये पहिल्या डेटवर तुम्ही काय काय केले होते? असाच एक प्रश्न सनी व करण या दोघांना विचारण्यात आला.

पण हा प्रश्न विचारताच करण देओल लाजू लागला. पापा (सनी देओल) समोर मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. मी नंतर याचे उत्तर देईल, असे तो म्हणाला. पण सनी मात्र या प्रश्नाचे उत्तर द्यायला उतावीळ दिसला. मी सांगतो, मी माझ्या पहिल्या डेटवर काय केले होते ते, असे म्हणत सनी बोलू लागला. ‘मैंने उसे देखा और फिर शर्मा के भाग गया...’ असे सनी म्हणाला. त्याचे ते उत्तर ऐकून सगळेच हसू लागले.

सनीने शोमध्ये धम्माल मस्ती केली. शोची जज रवीना टंडन हिच्यासोबत तो थिरकला.
‘पल पल दिल के पास’ हा चित्रपट एक लव्हस्टोरी आहे. करण देओलसोबत सहर बाम्बा ही सुद्धा या चित्रपटातून डेब्यू करतेय. येत्या 20 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

Web Title: what did sunny deol do on his first date actor reveal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.