ठळक मुद्देलग्नाच्या  6 वर्षे आधीपासून दीपिका व रणवीर रिलेशनशिपमध्ये होते.

दीपिका पादुकोणरणवीर सिंग आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. गतवर्षी 14 नोव्हेंबरला दीपवीर लग्नबंधनात अडकले होते. दीपवीरच्या लग्नाचा वाढदिवस कसा साजरा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना दोघांनी तिरूपतीचे दर्शन घेऊन लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आज सकाळी दीपवीर तिरूपती  बालाजी मंदिरात पोहोचले. यावेळी रणवीर व दीपिका दोघांचेही कुटुंब त्यांच्यासोबत होते. यादरम्यानचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये दीपिका व रणवीर पुन्हा एकदा नवविवाहित दांम्पत्याच्या लूकमध्ये दिसले.  लाल रंगाची भरजरी साडी, सोन्याचे दागिणे, भांगात कुंकू असा तिचा लूक होता. तर रणवीरने आॅफ व्हाईट कुर्ता पायजामा आणि सोबत गोल्डन एम्बरॉयडरीचा जॅकेट घातले होते. यावर सोनेरी किनार असलेली शाल त्याने पांघरली होती. रणवीर सिंगची शाल आणि दीपिकाची साडी परफेक्ट मॅच दिसत होते.

तिरूपती बालाजीच्या दर्शनानंतर दीपवीर पद्मावती मंदिराचे दर्शन घेणार आहे. यानंतर 15 नोव्हेंबरला म्हणजे उद्या हे कपल अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला भेट देणार आहे.  त्याच दिवशी, म्हणजे 15 नोव्हेंबरला ते आपल्या कुटूंबासह मुंबईला येण्यासाठी रवाना होतील. 

लग्नाच्या  6 वर्षे आधीपासून दीपिका व रणवीर रिलेशनशिपमध्ये होते. गलियों की रासलीला: रामलीला, पद्मावत, बाजीराव मस्तानी  या चित्रपटांमध्ये या जोडप्याने एकत्र भूमिका साकारल्या आहेत. आगामी चित्रपटाविषयी बोलायचे तर, ही जोडी पुन्हा एकदा ‘83’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. हा आगामी सिनेमा सन 1983 साली भारताने जिंकलेल्या विश्वचषकाच्या विजयी गाथेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीर सिंह कपिल देवची भूमिका साकारताना दिसणार आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: wedding anniversary, Deepika Padukone began her day with a trip to Tirupati with husband Ranveer Singh.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.