wajid khan death bollywood stars expressed grief sajid wajid fame | वाजिद खान यांच्या निधनाने दु:खात बुडाले बॉलिवूड

वाजिद खान यांच्या निधनाने दु:खात बुडाले बॉलिवूड

ठळक मुद्दे२०२० हे वर्ष जगाबरोबरच बॉलिवूडसाठीदेखील काळ ठरत आहे.अगोदर इरफान खान, नंतर ऋषी कपूर आणि आता प्रसिद्ध संगितकार वाजिद खान यांनीदेखील जगाचा निरोप घेतला. वाजिद खानच्या निधनाने अक्षरश: संपूर्ण बॉलिवूड शोकमग्न झाले.

रवींद्र मोरे
२०२० हे वर्ष जगाबरोबरच बॉलिवूडसाठीदेखील काळ ठरत आहे. अगोदर इरफान खान, नंतर ऋषी कपूर आणि आता प्रसिद्ध संगितकार वाजिद खान यांनीदेखील जगाचा निरोप घेतला. वाजिद खानच्या निधनाने अक्षरश: संपूर्ण बॉलिवूड शोकमग्न झाले. त्यांचे असे अचानक जाण्याने बऱ्याचजणांना विश्वासच होत नाहीय. बॉलिवूड स्टार्स वाजिद खान यांना विविध माध्यमातून श्रद्धांजली देत आहेत.

* अमिताभ बच्चन


बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर वाजिद खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'वाजिद खान यांच्या निधनाने मला धक्का बसला आहे. एक उज्ज्वल हसणारी प्रतिभा आम्हाला सोडून चालली गेली. त्यांच्यासाठी प्रार्थना आणि संवेदना '. अमिताभ बच्चन व्यतिरिक्त बॉलिवूडच्या इतर स्टार्सनीही वाजिद खानच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

* प्रियांका चोप्रा


अभिनेत्री प्रियांका चोप्राने दु:ख व्यक्त करत ट्विट केले आहे की, ‘खूपच दु:खदायक बातमी. एक गोष्ट मला जी नेहमी स्मरणात राहिल ती म्हणजे वाजिद यांचे हास्य. त्यांचे नेहमी हसतमुख राहणे. खूपच लवकर आम्हाला सोडून चालले गेले. त्यांच्या परिवारास आणि दु:ख व्यक्तत करणाºया लोकांना माझ्या संवेदना. आपल्या आत्म्यास शांती मिळो, माझ्या मित्रा. तुम्ही माझ्या विचारात आणि प्रार्थनामध्ये आहात.’

* वरुण धवन


अभिनेता वरुण धवन वाजिद खान यांंच्या निधनाने अक्षरश: सुन्न झाले. त्याने ट्विट करुन लिहिले आहे की, ‘वाजिद खान आणि माझे कुटुंब खूपच जवळ होते. ते जवळपास राहणाऱ्यांपैकी सर्वात सकारात्मक लोकांपैकी एक होते. आम्ही तुम्हाला सदैव स्मरणात ठेवू वाजिदजी. उत्कृष्ट संगितासाठी धन्यवाद!’

* परिणीती चोप्रा


वाजिद खान यांच्या जाण्याने परिणीती चोेप्रानेही दु:ख व्यक्त करत ट्विट केले आहे की, ‘वाजिदजी, आपण सर्वोत्कृष्ट व्यक्ती होेते. नेहमीच हसतमुख राहायचे. नेहमी गातच राहायचे. तुमच्या सोबतचे प्रत्येक संगीतसत्र आठवणीत राहिल. आपण खरंच नेहमी स्मरणात राहाल, वाजिदजी!’

* मिका सिंह


मिका सिंहलाही वाजिद खान यांच्या जाण्याचे दु:ख झाले असून त्याने ट्विट केले आहे की, ‘आम्हा सर्वांसाठी खूपच दु:खद बातमी...सर्वात प्र्रतिभाशाली गायक आणि संगितकार ज्यांनी एवढे हिट दिले आहेत, माझा मोठा भाऊ वाजिद खान आम्हाला सोडून चालले गेले...अल्लाह त्यांच्या आत्म्यास शांती देवो. मी नेहमीच तुमच्यावर प्र्रेम करत राहिल आणि आपणास नेहमी आठवणही करेल. आपले संगीत सदाबहार आहे. आपल्या जाण्याने बॉलिवूड उद्योगासाठी एक मोठे नुकसान आहे.’

* सोनू निगम
सोनू निगमनेदेखील वाजिद खान यांच्या निधनाने दु:ख व्यक्त केले. साजिद-वाजिद यांच्या सोबतचा एक फोटो शेअर करत सोनूने इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, ‘माझा भाऊ वाजिद खान आम्हाला सोडून चालले गेले.’

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: wajid khan death bollywood stars expressed grief sajid wajid fame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.