Vivek Oberoi's wounds are still fresh today .. Aishwarya Rai Bachchan told Plastics | विवेक ऑबेरॉयच्या जखमा आहेत आजही ताज्या.. ऐश्वर्या राय बच्चनला म्हटले प्लॉस्टिकचे
विवेक ऑबेरॉयच्या जखमा आहेत आजही ताज्या.. ऐश्वर्या राय बच्चनला म्हटले प्लॉस्टिकचे
विवेक ऑबेरॉय आणि ऐश्वर्या राय बच्चनचे ब्रेकअप हे इंडस्ट्रीसाठी नेहमीच एका चर्चाचा विषय ठरले आहे. ऐश्वर्याने विवेकला दिलेल्या जखमा आजही ताज्या आहेत. विवेकने दिलेल्या एका इंटरव्ह्यु दरम्यान त्यांने ऐश्वर्याचे मन प्लास्टिकचे असल्याचे म्हटले होते. ज्यावेळी विवेकचे ऐश्वर्यासोबत अफेयर सुरु होते त्या दरम्यान सलमान खान विवेकला फोन करुन धमकावले होते.  

विवेकच्या आधी ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमान खान होता. दोघांच्या अफेयरची चर्चासुद्धा खूप झाली होती. विवेकला डेट करायच्या आधी ऐश्वर्याने सलमानसोबत असलेल्या नात्याला पूर्ण विराम दिला होता. मात्र काही केल्या सलमान ही गोष्ट मानायला तयार नव्हता. ऐश्वर्या हे नातं संपवून खूप पुढे निघून गेली होती. त्यामुळे चिढलेल्या सलमानने विवेकला फोनवर धमकी दिली होती. या प्रकारानंतर विवेकने प्रेंस कॉन्फरेंस बोलवली होती. यात त्यांने सलमानने आपल्याला 41 वेळा फोन करुन धमकी दिल्याचे सांगितले होते. तसेच सलमानने आपल्या जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांने एका टीव्हीवर सांगितले होते. यासंपूर्ण प्रकारानंतर ऐश्वर्याने विवेकसोबत असलेल्या आपल्या नात्यालादेखील पूर्णविराम दिला होता.  

तेरे मेरे बीच या टीव्ही शोमध्ये विवेक ऑबेरॉयने  सांगितले होते की, '' या घटनेनंतर तिने (ऐश) मला म्हटले तो ऐवढा अपरिपक्व कसा. मी आता हे सगळं विसरली आहे.'' पुढे विवेक म्हणाला,'' ऐश्वर्याचे मनच नाही तर तिच पूर्ण प्लॉस्टिकची आहे. या इंटस्ट्री फक्त ऐश्वर्याच नाही तर अनेकजण प्लॉस्टिकचे आहेत. मी सुद्धा हे सगळ विसरुन आता आयुष्यात पुढे निघून गेलो आहे.''  

ALSO READ : प्रियांका चोप्रसोबत नाही तर अभिषेक बच्चनची ऐश्वर्या राय बच्चन सोबत जमणार जोडी

विवेक ऑबेरॉयने काही वर्षांपूर्वी एक स्टेज परफॉरमेंस दरम्यान सलमान खानची माफी मागितली होती. मात्र सलमानशी घेतलेला पंगा विवेकला चांगलाच महागात पडला. काही वर्षे तर विवेकला कामसुद्धा मिळाले  नव्हते. नुकताच त्याचा साऊथचा चित्रपट विवेगम रिलीज झाला. यात विवेकच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. तर काही महिन्यांपूर्वी रितेश देशमुखसोबत आलेला बँक चोर चित्रपट चांगलाच आपटला.   
Web Title: Vivek Oberoi's wounds are still fresh today .. Aishwarya Rai Bachchan told Plastics
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.