VIRAL VIDEO: Ranbir Kapoor started flirting with Deepika in the bathroom and then something happened ... | VIRAL VIDEO: बाथरुममध्ये दीपिका असल्याचं समजून फ्लर्ट करू लागला रणबीर कपूर आणि मग घडले असे काही...

VIRAL VIDEO: बाथरुममध्ये दीपिका असल्याचं समजून फ्लर्ट करू लागला रणबीर कपूर आणि मग घडले असे काही...

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण एकेकाळी अभिनयासोबत त्यांच्या अफेयरमुळे चर्चेत होते. ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीनदेखील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. मात्र त्या दोघांचे रिलेशन जास्त काळ चालू शकले नाही आणि ते वेगळे झाले. आता दोघे खूप चांगले मित्र आहेत. पण आता दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

खरेतर सोशल मीडियावर रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ आहे त्यांचा चित्रपट ये जवानी है दीवानीमधील. या व्हिडिओची विशेष बाब म्हणजे हा व्हिडिओ चित्रपटासाठी शूट झाला होता पण तो वापरला नाही. त्यामुळे हा व्हिडिओ चित्रपटात पहायला मिळाला नाही.

ये जवानी है दिवानी चित्रपटात रणबीर कपूरने बनी आणि दीपिका पादुकोणने नैनाची भूमिका साकारली होती. व्हिडिओत पहायला मिळतंय की, बनी नैनाच्या घरी जातो आणि नैनाला शोधू लागतो. नैना सापडत नाही पण बाथरुममध्ये शॉवरचा आवाज येतो. बनीला वाटते की नैना बाथरुममध्ये आहे आणि तो दरवाजा बाहेर उभे राहून नैना समजून मस्करीत घाणेरडे बोलत फ्लर्ट करू लागला. त्यानंतर नैना दुसऱ्या खोलीत असते. ती बनीचा आवाज ऐकून येते आणि त्याचे फ्लर्टिंग ऐकून घराबाहेर जायला सांगते. तितक्यात बाथरुममधून एक महिला बाहेर येते आणि स्वतःला नैनाची आई सांगते. बनी लाजेने कावराबावरा होतो.

सोशल मीडियावर युजर्स या व्हिडिओला खूप पसंती दर्शवित आहेत कारण बनीच्या वर्तणूकीवर नैना रागावते आणि संपूर्ण सिच्युएशन खूप मजेशीर आहे. जवानी है दीवानी चित्रपट 2013 साली रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या कथानाकापासून डायलॉग्ज, गाणी प्रेक्षकांना खूप आवडले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: VIRAL VIDEO: Ranbir Kapoor started flirting with Deepika in the bathroom and then something happened ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.