ठळक मुद्देअंकिता व सुशांत एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. एक दोन वर्षे नाही तर सहा वर्षे दोघेही एकमेकांसोबत होते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनाला 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु आहे आणि सुशांतला न्याय मिळावा, ही सर्वांची अपेक्षा आहे. तूर्तास सुशांतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे जाम संतापली आहे. हा व्हिडीओ पाहताच अंकिता भडकली आणि तिने नेटक-यांना चांगलेच सुनावले.
हा व्हिडीओ सुशांतच्या अंत्यसंस्काराचा आहे. यात सुशांतचे पार्थिव चितेवर ठेवलेले आहे. एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला आणि शेअर करण्यामागचे कारणही सांगितले. ‘हा व्हिडीओ मी शेअर करू इच्छित नव्हतो. मात्र  जेव्हाकेव्हा बॉलिवूड सिनेमे पाहण्याचा विचार मनात येईल, तेव्हा हा चेहरा एकदा आठवावा, म्हणून मी हा व्हिडीओ शेअर केला,’ असे या युजरने लिहिले. हा व्हिडीओ शेअर करताना युजरने सुशांतची बहिण शिवाय अंकितासह अनेकांना टॅग केले.

युजरने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून अंकिताचा पारा चढला. तिने या युजरने चांगलेच फैलावर घेतले. ‘तुला झाले तरी काय? असे व्हिडीओ शेअर करणे बंद कर. हे सगळे पाहणे आमच्यासाठी प्रचंड वेदनादायी आहे. त्वरित हा व्हिडीओ डिलीट करावा, अशी मी विनंती करते़ तुम्ही सगळे त्याच्यावर (सुशांत) प्रेम करता, मला ठाऊक आहे. पण त्याच्यावरचे प्रेम दर्शवण्याची ही पद्धत नाही. मी हात जोडून विनंती करते, की हा व्हिडीओ डिलीट करा,’ असे अंकिताने लिहिले.

काही लोकांनी अंकिताच्या या ट्विटला पाठींबा दिला. पण काहींनी मात्र यावरून अंकितालाच सुनावले. इतका त्रास होतो तर तू हा व्हिडीओ रिट्विट का केला? असा सवाल अनेकांनी तिला केला.
 14 जूनला सुशांतचा मृतदेह फासावर लटकलेला सापडला होता. अंकिता त्याच्या अंत्यसंस्कारात सामील झाली नव्हती. मी सुशांतला असे पाहूच शकत नव्हते. म्हणून मी त्याच्या अंत्यसंस्कारात सामील झाली नव्हती, असे अंकिता म्हणाली होती.

म्हणून झाले होते अंकिता व सुशांतचे ब्रेकअप
अंकिता व सुशांत एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. एक दोन वर्षे नाही तर सहा वर्षे दोघेही एकमेकांसोबत होते. दोघे लग्न करणार, असे मानले जात असतानाच अचानक दोघांचे ब्रेकअप झाले होते. असे म्हटले जाते की, सुशांत टीव्ही इंडस्ट्री सोडून बॉलिवूडमध्ये आल्यानंतर दोघांमध्ये खूप भांडणे होऊ लागली होती. रिपोर्टनुसार, ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका संपल्यावर अंकिताकडे दुसरा कोणताच प्रोजेक्ट नव्हता. याऊलट सुशांत बॉलिवूडमध्ये प्रचंड बिझी झाला होता. यामुळे अंकिताला तो वेळ देऊ शकत नव्हता. सोबत  सुशांतच्या अन्य हिरोईनसोबतच्या लिंकअपच्या बातम्याही झळकू लागल्या होत्या. या चर्चा अंकिताला खूप त्रास देऊ लागल्या होत्या. त्यामुळे दिवसेंदिवस अंकिता सुशांत व तिच्या नात्याबाबतीत खूपच हळवी होऊ लागली होती. तिचा पझेसिव्हनेस दिवसेंदिवस वाढत होता. याला सुशांत कंटाळला होता.

मॅडम हे काय? कपड्यांमुळे ट्रोल झाली अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडेला बरं-वाईट बोलली; हेटर्सनी शिबानी दांडेकरची 'ओळखच बदलली'!

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: viral social ankita lokhande lashesout on social media user after seen sushant singh rajput funeral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.