ठळक मुद्देअंकिता सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सहा वर्षे दोघे एकमेकांना डेट करत होते. 

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे अचानक ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. होय, अंकिताने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केलेत आणि तिचे फोटो पाहून युजर्स तिच्यावर जणू तुटून पडलेत. अंकिताने या फोटोत परिधान केलेले कपडे पाहून अनेकांचे माथे ठणकले. यापैकी अनेकांनी तिला असे कपडे न घालण्याचा सल्लाही दिला.


होय, अंकिताने ब्ल्यू टी-शर्ट आणि यॅलो पायजामा घातलेला फोटो शेअर केला. ब्ल्यू टी-शर्ट तर ठीक होते. पण तिच्या पायजामा पाहून लोकांच्या भावना दुखावल्यात. होय, कारण या पायजाम्यावर काही मंत्रांसोबत ‘ॐ’ लिहिलेले होते. ॐ हे हिंदू धर्माचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे ओम लिहिलेला पायजामा घालून अंकिताने फोटोसेशन केलेले अनेकांना रूचले नाही.

असा दिला सल्ला

मॅडम, माझे तुझ्यासोबत कुठलेही शत्रूत्व नाही, ना मी तुला शिव्या देतेय. पण कृपा करून तू जो पायजामा घातला आहे, तो घालू नको. ॐ या चिन्हाला आपण सृष्टीच्या सृजनाचे प्रतिक मानतो. हे प्रतिक असलेला पायजामा तू घातला आहेस, असे एका युजरने अंकिताच्या या फोटोवर प्रतिक्रिया देताना लिहिले.
अन्य एका युजरने अंकिताला खरपूस शब्दांत सुनावले. तुम्ही लोकांनी आपल्या संस्कृतीची वाट लावली आहे, असे या युजरने लिहिले.

व्हायरल होतोय जुना व्हिडीओ
अंकिता व तिचा बॉयफ्रेन्ड विकी जैन यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. तसा हा व्हिडीओ जुना आहे.यात अंकिता व विकी पार्टीत डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओत आधी अंकिता विकीसोबत डान्स करते, मग त्याला अलिंगण देते आणि नंतर सर्वांसमोर किस करते. हा व्हिडीओ 2019 मधील असल्याचे कळतेय. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने हा व्हिडीओ त्याच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

सुशांतसोबत होती नात्यात

अंकिता आधी सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सहा वर्षे दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकी जैनची एन्ट्री झाली. गेल्यावर्षी अंकिताने विकीसोबतचे तिचे नाते पब्लिक केले होते. काही महिन्यांपूर्वी अंकिताने रिंगचा फोटो शेअर केला होता. त्यावरून तिने विकीसोबत साखरपुडा केल्याचे म्हटले गेले होते. अर्थात अंकिताने या वृत्ताला अद्यापही दुजोरा दिलेला नाही.

अंकिता लोखंडेला बरं-वाईट बोलली; हेटर्सनी शिबानी दांडेकरची 'ओळखच बदलली'!

म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नव्हते...! अंकिता लोखंडेने पहिल्यांदाच सांगितले कारण

तुम्ही त्याला ड्रग्ज देणार का?
  व्यक्तीवर तुमचे  प्रेम आहे, ती व्यक्ती नैराश्यात असतानाही तुम्ही तिला ड्रग्स देणार का? असा सवाल करत अलीकडे अंकिताने  रिया चक्रवर्तीवर टीका केली होती. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेल्या रियाला नुकतीच  एनसीबीने अटक केली. रियाच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर रियाला पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर अंकिताने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित रिया आणि तिला पाठींबा देणा-यांना सुनावले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ankita lokhande om print pajama makes people angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.