ठळक मुद्दे गेल्या काही दिवसांपासून शिबानी सतत अंकिताला लक्ष्य करतेय. अंकिता केवळ पब्लिसिटीसाठी सारं काही करत असल्याचा आरोप अलीकडे शिबानीने केला होता.

 अंकिता लोखंडे हिच्यावर टीका करणे, तिच्यावर नको ते आरोप लावणे फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड शिबानी दांडेकर हिला भलतेच महागात पडले आहे. अंकिता सारं काही पब्लिसिटीसाठी करतेय, या शिबानीच्या आरोपानंतर काही लोकांनी शिबानीला सोशल मीडियावर अक्षरश: झोडपून काढले. इतकेच नाही तर काही हेटर्सनी विकिपीडियाच्या पेजवरही शिबानीबद्दल अपशब्दांचा वापर केल्याचे दिसले. शिबानी दांडेकर एक भारतीय फ्लॉप सिंगर, अ‍ॅक्ट्रेस, अँकर व गोल्ड डिगर असल्याचे तिच्या विकिपीडिया पेजवर लिहिल्याचे आढळले.

विकिपीडियाच्या पेजशी छेडछाड
अंकितावर टीका करणा-या शिबानीच्या विकीपीडिया पेजशी छेडछाड करत काही युजर्सनी तिच्याबद्दल अपशब्दांचा वापर केला. शिबानी दांडेकर एक भारतीय फ्लॉप सिंगर, अ‍ॅक्ट्रेस, अँकर व गोल्ड डिगर आहे. शिबानीने अमेरिकन टेलिव्हिजनच्या एका शोपासून आपल्या फ्लॉप करिअरची सुरुवात केली. भारतात आल्यानंतर तिला एका श्रीमंत मुलाचा शोध होता, जो तिला प्रसिद्धी मिळवून देईल. अशात तिने बी-ग्रेड अ‍ॅक्टर फरहान अख्तरला डेट करणे सुरु केले, असे विकिपीडियावर लिहिण्यात आले.
शिबानीच्या विकिपीडिया पेजशी छेडछाड झाल्याचे लक्षात येताच, विकिपीडियाने पेजवरचा आक्षेपार्ह मजकूर गाळत पेज नव्याने अपडेट केले.

सतत करतेय अंकिताला लक्ष्य
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्याने एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली. रियाला अटक झाल्याने सुशांतचे कुटुंबीय व चाहते एकीकडे खूश आहेत. दुसरीकडे बॉलिवूडचे सेलिब्रिटी रिया चक्रवर्तीचा सपोर्ट करताना दिसत आहेत.फराहन अख्तरची गर्लफ्रेन्ड शिबानी दांडेकर त्यापैकीच एक. करतानाच सोबत सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिबानी सतत अंकिताला लक्ष्य करतेय. अंकिता केवळ पब्लिसिटीसाठी सारं काही करत असल्याचा आरोप अलीकडे शिबानीने केला होता.

शिबानी म्हणाली, अंकिताला केवळ प्रसिद्धी हवी
अंकिता लोखंडेवर शिबानीने  जोरदार हल्ला चढवला होता.
‘ही महिला केवळ 2 सेकंदाची सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सगळे करतेय. प्रसिद्धीसाठीच ती रियाला सतत लक्ष्य करतेय. कारण ती स्वत: सुशांतसोबतच्या तिच्या नात्यातील अडचणींवर मात करू शकली नव्हती, असे शिबानी म्हणाली होती.

'टीव्हीवर काम करणाऱ्यांना कमी समजू नको', रियाची मैत्रीण शिबानीला अंकिताचं सडेतोड उत्तर

हे सारं पब्लिसिटीसाठी...! शिबानी दांडेकर बोलली, अंकिता लोखंडेच्या फॅन्सची सटकली

अंकिताचे चाहते भडकले
शिबानीने अंकिताला लक्ष्य करताच अंकिताचे चाहते भडकले होते. त्यांनी शिबानी दांडेकरला चांगलेच फैलावर घेतले होते. अंकिता तुझ्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहे. 50 वर्षांच्या फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड असण्याव्यतिरिक्त तुझी काहीही ओळख नाही. कदाचित तुच पब्लिसिटीसाठी अंकिताला लक्ष्य करतेय, अशा शब्दांत अंकिताच्या एका चाहत्याने शिबानीला सुनावले होते.
एका युजरने थेट फॉलोअर्सच्या संख्येचा स्क्रिनशॉट शेअर करत, शिबानीला टोला लगावला होता. अंकिता व तुझे स्वत:चे फॉलोअर्स बघ. कोणाला पब्लिसिटीची गरज आहे, हे यावरून स्पष्ट आहे, अशा शब्दांत एका युजरने शिबानीला सुनावले होते.

शिबानीने याआधीही केले होते रियाचे समर्थन
 काही दिवसांपूर्वी विद्या बालन, तापसी पन्नू या अभिनेत्रींनी रियाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिबानी दांडेकर रियाला सपोर्ट करताना दिसली होती. शिबानीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर रियाला पाठिंबा दिला होता. रियाने सुशांतवर प्रेम केले याचीच तिला शिक्षा मिळतेय, अशी ती म्हणाली होती.
‘रिया १६ वर्षांची असल्यापासून मी तिला ओळखते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मी तिची आणि तिच्या कुटुंबाची एक नवीनच बाजू पाहते. ज्याचा आपण विचार करु शकत नाही अशा गोष्टी, त्रास ते सहन करत आहेत. प्रसारमाध्यमे कशाप्रकारे त्यांच्यासोबत वागत आहेत हे दिसून येतेय. एका निरपराध कुटुंबावर आरोप करण्यात येत आहेत आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होईल इथपर्यंत त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे,’ असे शिबानी म्हणाली होती.
 
 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shibani dandekars wikipedia page edited to gold digger and flop singer after slamming ankita lokhande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.