Vijay Sethupathi कधी टेलीफोन बूथवर होता ऑपरेटर, आज साऊथच्या सिनेमात वाजतो त्याच्या अभिनयाचा डंका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:04 PM2022-01-21T18:04:07+5:302022-01-21T18:09:06+5:30

Vijay Sethupathi Journey : विजयचं पूर्ण नाव आहे विजय गुरूनाथ सेतुपति कालीमथु. त्याच्या जन्म १६ जानेवारी १९७८ मध्ये तामिळनाडूच्या राजपलायम नावाच्या शहरात झाला होता.

Vijay Sethupathi worked as phone booth operator in his early days real story of Vijay Sethupathi | Vijay Sethupathi कधी टेलीफोन बूथवर होता ऑपरेटर, आज साऊथच्या सिनेमात वाजतो त्याच्या अभिनयाचा डंका

Vijay Sethupathi कधी टेलीफोन बूथवर होता ऑपरेटर, आज साऊथच्या सिनेमात वाजतो त्याच्या अभिनयाचा डंका

Next

जर तुम्ही साऊथ इंडियन सिनेमे बघत असाल तर विजय सेतुपति (Vijay Sethupathi) हे नाव तुम्हाला माहीत असेलच. विजय सेतुपति एक साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार आहे. ज्याचं काम केवळ साऊथमधेच नाही तर देशभरात पसंत केलं जातं. तो प्रामुख्याने तमिळ सिनेमांमध्ये काम करतो. त्यासोबतच त्याने काही मल्याळम आणि तेलुगु सिनेमांमध्येही काम केलं आहे. आज तो मोठा अभिनेता आहे. पण एक अभिनेता होण्याआधी त्याने अनेक सामान्य कामं केली. 

दमदार अभिनेता Vijay Sethupathi

विजयचं पूर्ण नाव आहे विजय गुरूनाथ सेतुपति कालीमथु. त्याच्या जन्म १६ जानेवारी १९७८ मध्ये तामिळनाडूच्या राजपलायम नावाच्या शहरात झाला होता. विजय एका सामान्य परिवारातून आहे. ज्यांचा फिल्मी दुनियेशी काहीच संबंध नव्हता. पण विजयच्या मनात सिनेमात काम करणं होतं. पण सामान्य लूक आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे तो पुढे जाऊ शकत नव्हता. 

अनेक ऑडिशन देऊन फेल

Vijay Sethupathi ने त्यांची शालेय शिक्षण कोडंबक्कमच्या MGR Higher Secondary School मधून पूर्ण केलं. त्यानंतर त्याने चेन्नईमधून बी-कॉमची पदवी घेतली. असं  सांगितलं जातं की, त्याने सुरूवातीच्या काळात अनेक सिनेमांसाठी ऑडिशन दिले होते. पण यश काही हाती लागलं नाही. त्याला नेहमीच हेच सांगितलं जात होतं की, अभिनयात दम नाही. पण त्याची आर्थिक स्थिती ठीक नव्हती त्यामुळे तो यासाठी जास्त वेळ देऊ शकला नाही.

वेगवेगळ्या प्रकारची कामं केली

सुरूवातीला विजयने वेगवेगळ्या प्रकारची कामं केली. तो तिच्या खर्चांसाठी परिवारावर अवलंबून नव्हता. त्याने सेल्समन, हॉटेलमध्ये कॅशिअर आणि टेलिफोन बूथवर टेलिफोन ऑपरेटर म्हणूनही काम केलं होतं. त्यानंतर त्याला अकाउंटटची नोकरी मिळाली होती. घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी विजयने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. पण काही वर्षाने तो भारतात परतला आणि भारतातच आपल्या मित्रासोबत इंटेरिअर डिझायनिंगचं काम सुरू केलं

कसं बदललं विजयचं नशीब?

असं म्हणतात की, नशीबात लिहिलेलं कशी टळत नाही. विजयच्या नशीबात फिल्मी दुनिया लिहिलेली होती आणि तो तिथे आलाच. तो एका मार्केटींग कंपनीसाठी काम करत होता, तेव्हा त्याची भेट दिग्दर्शक महेंद्र बाबू यांच्यासोबत झाली होती. त्यांनीच विजयला संधी दिली.

महेंद्र बाबूच्या सांगण्यावरून विजयने पुन्हा आपला मोर्चा फिल्म इंडस्ट्रीकडे वळवला. सुरूवातीला त्याने छोटे छोटे सपोर्टिंग रोल केले. पण त्याचं नशीब चमकलं २०१० मध्ये आलेल्या Thenmerku Paruvakaatru  या तमिळ सिनेमातून. यात त्याला मोठा रोल मिळाला होता.

हाच विजय सेतुपतिचा टर्निंग पॉइंट होता आणि त्यानंतर त्याला अनेक मोठ्या सिनेमात काम मिळालं. २०१२ मध्ये आलेल्या Sundarapandian तमिळ सिनेमात त्याने निगेटिव्ह भूमिका केली होती. आतापर्यंत विजय ९० पेक्षा जास्त सिनेमे केले आहेत.

विक्रम वेदा  

२०१७ मध्ये आलेल्या तमिळ 'विक्रम वेदा'मध्ये तो आर. माधवनसोबत दिसला. हा एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा होता. ज्यात विजय सेतुपतिने क्रिमिनलची भूमिका साकारली होती. यातील त्याच्या कामाचं फार कौतुक झालं. सिनेमा सुपरहिट ठरला. याने त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. आता या सिनेमावर बॉलिवूडमध्ये रिमेक बनत आहे. ज्यात हृतिक रोशन विजय सेतुपतिची भूमिका साकारत आहे. विजय सेतुपति आज एक यशस्वी अभिनेत्यासोबत एक निर्माताही आहे. त्याला २०२१ मध्ये National Film Award ने सन्मानित करण्यात आलं आहे. 
 

Web Title: Vijay Sethupathi worked as phone booth operator in his early days real story of Vijay Sethupathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app