ठळक मुद्देलवकरच विद्या शंकुतला देवी यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत सान्या मल्होत्राही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

विद्या बालन ही बॉलिवूडची तशी बिनधास्त अभिनेत्री़ ‘द डर्टी पिक्चर’ या सिनेमात विद्याचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. या सिनेमात विद्याचा एक वेगळाच अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. पण हा एक अपवाद सोडला तर विद्याच्या चित्रपटातील तिचा सहज, सुंदर व शालीन भाव लोकांच्या लक्षात राहिला. ‘द डर्टी पिक्चर’नंतर विद्याचा तेवढा बोल्ड अवतार कधीच पाहायला मिळाला नाही. पण हो, 2015 मध्ये एका बोल्ड आणि न्यूड फोटोशूटमुळे ती चर्चेत आली होती. लॉकडाऊनदरम्यान विद्याच्या या न्यूड फोटोशूटचा फोटो पुन्हा एकदा व्हायरल होतोय. या फोटोने सोशल मीडियावरच्या तिच्या चाहत्यांना वेड लावले आहे.

हा फोटो व्हायरल होण्याचे कारण काय तर लोकप्रिय फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांने तो शेअर केला आणि शेअर करताच व्हायरल झाला. बॉलिवूड इंडस्ट्रीत 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त डब्बूने हा फोटो शेअर केला आहे. यात विद्या बालनने न्यूड पोज दिली आहे. विद्याच्या या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय.

डब्बू रत्नानीच्या कलेंडरवर विद्या अनेकदा झळकली आहे. त्याच्यासाठी तिने अनेकदा फोटोशूट केले आहे. सर्वप्रथम 2011 साली तिने डब्बूसाठी फोटोशूट केले होते. यात तिने टॉपलेस पोझ दिली होती. 2015 मध्ये मात्र तिने न्यूड पोज देत सगळ्यांना हैराण केले होते.

विद्या बालनने ‘परिणीता’ या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. पा, डर्टी पिक्चर, डेढ इश्किया, भूल भूलैय्या, कहानी, नो वन किल्ड जेसिका, हमारी अधुरी कहानी, मिशन मंगल अशा अनेक सिनेमांमध्ये ती दिसली.

लवकरच विद्या शंकुतला देवी यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत सान्या मल्होत्राही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. लॉकडाऊनमुळे हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होत आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: vidya balan nude and bold photo viral on social media-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.