ठळक मुद्देशकुंतला देवींनी अगदी लहानपणापासूनच झटपट आकडेमोड करण्याच्या आपल्या प्रज्ञेने जगाला थक्क करून सोडले होते.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओत विद्या चोरून-लपून खिडकीतून हॉटेलच्या आत प्रवेश करताना दिसतेय.
 खुद्द विद्याने  हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.   ‘मुंबईतल्या शालीमार हॉटेलने मला हा माझा आवडता सीन करण्याची प्रेरणा दिली,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना विद्याने लिहिले आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून लोकांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स दिल्या आहेत.


सध्या विद्या बालन महान गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटात बिझी आहे. यात विद्या शकुंतला देवीची भूमिका साकारताना दिसणार आहे.  पुढील वर्षी प्रदर्शित होऊ घातलेल्या या चित्रपटात सान्या मल्होत्राही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अनु मेनन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.


शकुंतला देवींनी अगदी लहानपणापासूनच झटपट आकडेमोड करण्याच्या आपल्या प्रज्ञेने जगाला थक्क करून सोडले होते. कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नसताना शकुंतला देवींचे नाव जगभरात  गणितज्ज्ञ म्हणून गाजले. त्यांच्या आकडेमोड करण्याच्या अद्भुत कौशल्याची दखल गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने देखील घेतली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: vidya balan enters like a thief in hotel video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.