Video: सुशांतच्या निधनापूर्वी रिया चक्रवर्तीने शेअर केला होता स्वतःचा व्हिडिओ, आता होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 05:34 PM2020-08-31T17:34:46+5:302020-08-31T17:35:33+5:30

रिया चक्रवर्तीने यादरम्यान काही ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. इतकेच नाहीतर 14 जूनला देखील रियाने एक व्हिडिओ शेअर केला होता.

Video: Before Sushant's death, Riya Chakraborty shared her own video, now it is going viral | Video: सुशांतच्या निधनापूर्वी रिया चक्रवर्तीने शेअर केला होता स्वतःचा व्हिडिओ, आता होतोय व्हायरल

Video: सुशांतच्या निधनापूर्वी रिया चक्रवर्तीने शेअर केला होता स्वतःचा व्हिडिओ, आता होतोय व्हायरल

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीची सीबीआय चौकशी करत आहे. नुकतेच रियाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, 8 जून रोजी ती सुशांतचे घर सोडून गेली होती. तिने सांगितले होते की सुशांतने तिला घरातून जायला सांगितले होते आणि त्यामुळे ती खूप दुःखी होती. आता रियाच्या या विधानानंतर तिचे काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जे तिने 8 जूननंतर 14 जूननंतर केलेले पोस्ट आहेत.  


रिया चक्रवर्तीने यादरम्यान काही ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. इतकेच नाहीतर 14 जूनला देखील रियाने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात ती स्विमिंग पूलच्या जवळ दिसते आहे.


रिया चक्रवर्तीने एक व्हिडिओ शेअर करत लिहिले होते की, मी खरेच शूटिंग खूप मिस करते आहे. ओके बाय. यासोबतच रियाने रागातील इमोजीदेखील शेअर केला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआय सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीकडून शेवटच्या तासाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सीबीआय जाणून घ्यायचे आहे की तिने 8 जूनला सुशांतसोबत ब्रेकअप केले होते का ?   जर हो तर ब्रेकअप मागचे काय कारण होते ?  


या व्यतिरिक्त सीबीआयने रियाला चौकशीदरम्यान विचारले की 8 जूनपासून 14 जून पर्यंत तिने सुशांतच्या तब्येतीबद्दल का विचारले नाही ?  त्यावर अभिनेत्रीने सांगितले की, तिने भाऊ शौविक चक्रवर्तीच्या माध्यमातून सुशांतच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली होती.

Web Title: Video: Before Sushant's death, Riya Chakraborty shared her own video, now it is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.