VIDEO: Neha Kakkar and Rohanpreet Singh's grand reception held in Punjab, her mother-in-law gave her a warm welcome | VIDEO: नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगचे पंजाबमध्ये पार पडलं ग्रॅण्ड रिसेप्शन, सासरी तिचे झाले जंगी स्वागत

VIDEO: नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगचे पंजाबमध्ये पार पडलं ग्रॅण्ड रिसेप्शन, सासरी तिचे झाले जंगी स्वागत

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा २४ ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात विवाह संपन्न झाला. त्यांनी दिल्लीतील एका गुरूद्वारामध्ये सात फेरे घेतले. त्यांनी हे लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नव्हती. आता नेहा सिंग कुटुंबाची सून झाली आहे. सासरी नेहाचे स्वागत कसे झाले, याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

रोहनप्रीत सिंगच्या घरी नवोदीत वधू नेहा कक्करचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर तिचा एक व्हिडीओ समोर आला ज्यात नेहा आणि रोहनप्रीत ढोलवर थिरकताना दिसले. नेहाने यावेळी पिंक रंगाचा सूट परिधान केला आहे तर रोहनप्रीत ट्रॅक सूटवर दिसतो आहे.


सोमवारी पंजाबमध्ये रोहनप्रीत आणि नेहाचा स्वागत समारंभ पार पडला होता. यावेळी कुटुंबातील आणि जवळचे मित्र मंडळी उपस्थित होते. या सोहळ्यावेळी दोघेही खूप खूश होते. यावेळी नेहाने पांढऱ्या रंगाचा लेहंगा आणि रोहनप्रीतने निळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.


नेहा आणि रोहनप्रीत यांचे लग्न खासगीत झाले होते. या सोहळ्याला फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी उपस्थित होते. नेहा कक्करने कोरोनाच्या काळादरम्यान लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

View this post on Instagram

Her voice and her smile❤️😍🥰 #nehudavyah #nehupreet ❤️ . .________________________________ [💫: Follow for best pics] [💫: Follow for best throwbacks] [💫: Follow for beautiful videos] [💫: Follow for amazing edits] [💫: Follow for best reels] ________________________________ @team__tonykakkar @team__tonykakkar @team__tonykakkar @team__tonykakkar @team__tonykakkar @team__tonykakkar . . . • • • • • • • 𝐈𝐠𝐧𝐨𝐫𝐞 𝐓𝐚𝐠𝐬🏷️ #nehakakkar #rohanpreet #rohanpreetsingh #nehudiaries #neheart #nehuhappyneheartshappy #nehuzindagihai #nehakakkarsongs #nehakakar #nehakakkarlive #nehearts #nehakakkarfans #reelsinstagram #reelkarofeelkaro #reels #reelitfeelit #explore #explorepage #receptiondress #reception #singing #bride

A post shared by Tony kakkar🧿 (@team_tonykakkar) on

तिच्या लग्न सोहळ्यात खास लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. यात उर्वशी ढोलकिया, पंजाबी गीतकार बानी संधू, जस्सी लोहका आणि अवनीत कौर ही मंडळी उपस्थित होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: VIDEO: Neha Kakkar and Rohanpreet Singh's grand reception held in Punjab, her mother-in-law gave her a warm welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.