बॉलिवूड अभिनेता विकी कौशल काही महिन्यांपूर्वी चित्रपटांसोबतच त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आला होता. एका मुलाखती दरम्यान विकीने इशारो-इशारोमध्ये लेडी लव्ह हरलीन सेठीवरील प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर काहीच दिवसांनी दोघांचे ब्रेकअप झाल्याचे बोलले गेले होते. आता त्याची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठी हिने इंस्टाग्रामवर ब्राईड लूकमधील फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ती कोणासोबत लग्नबेडीत अडकणार आहे, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.

हरलीन सेठी हिने इंस्टाग्रामवर लाल रंगाच्या लेहंगामधील वधूच्या गेटअपमधील फोटो शेअर केला आहे आणि म्हटलंय की, समीरासाठी खूप मोठा दिवस.


आता ही समीरा आहे तरी कोण आणि हरलीन लग्न करणार आहे का, अशी चर्चा सध्या रंगली आहे. खरंतर हरलीन सेठीच्या  'ब्रोकन बट ब्यूटीफूल' या वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि त्यातील हा तिचा लूक आहे. बहुतेक दुसऱ्या सीझनमध्ये ती लग्न करताना दिसणार आहे.


'ब्रोकन बट ब्यूटीफूल' या सीरिजची निर्मिती एकता कपूरने केली असून यात विक्रांत मेस्सी, शीतल ठाकूर, मेहरजादा माजदा व जितिन गुलाटी मुख्य भूमिकेत आहेत.


नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार विकीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर हरलीन डिप्रेशनमध्ये गेली आहे. डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी हरलीन कुटुंबीयांसोबत जास्ती जास्त वेळ घालवतेय. रिपोर्टनुसार हरलीन लवकरच डिप्रेशनमधून बाहेर येईल. कॅटरिना कैफसोबत विकीच्या वाढत्या जवळीकीमुळे हरलीन दुखावली आणि तिने विकीसोबत ब्रेकअप केले. तेव्हापासून कॅट व विकी यांच्या ऑफस्क्रिन रोमान्सच्या चर्चा सुरु झाल्या. या चर्चेत किती तथ्य आहे, हे तर आम्हाला ठाऊक नाही.

English summary :
Harleen Sethi shared her wedding look. She recently appeared in 'Broken But Beautiful' web-series. Check out latest news around Bollywood in Marathi follow Lokmat.com. Stay updated.


Web Title: Vicky Kaushal's ex girlfriend Harleen Sethi gets married ?, shared photo on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.