Vicky Kaushal’s brother Sunny arrested for dancing outside Salman and Shah Rukh Khan’s residence | या अभिनेत्याला सलमान, शाहरूखच्या बंगल्यासमोर डान्स पडला महाग, पोलिसांनी केली अटक

या अभिनेत्याला सलमान, शाहरूखच्या बंगल्यासमोर डान्स पडला महाग, पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्दे‘भंगडा पा ले’ या चित्रपटात सनी कौशलच्या अपोझिट तेलगू अभिनेत्री रूखसार ढिल्लोची वर्णी लागली आहे.

विकी कौशलने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आता विकीपाठोपाठ त्याचा भाऊ सनी कौशल हाही फिल्मी दुनियेत नशीब आजमावतो आहे. असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुरुवात करणा-या सनीने ‘सन शाईन म्युझिक टुर्स अ‍ॅण्ड ट्रव्हल्स’ या चित्रपटातून डेब्यू केला. यानंतर तो अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटात झळकला. लवकरच ‘भांगडा पा ले’ या चित्रपटात तो लीड रोलमध्ये दिसणार आहे. आता नवा चित्रपट म्हटले की, त्याचे प्रमोशन आलेच आणि प्रमोशन म्हटले की, त्यासाठी वेगवेगळ्या कल्पनाही आल्या. सनीने आपल्या या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगळीच शक्कल लढवली. पण ही शक्कल त्याला जरा महाग पडली. होय, यामुळे सनीला पोलिसांनी अटक केली. 


सनी ‘भांगड़ा पा ले’च्या प्रमोशनसाठी करण्यासाठी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि दबंग खान सलमानच्या घराबाहेर पोहोचले. त्यांनी तेथे चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. त्यांचा डान्स पाहून चाहत्यांची गर्दी जमली नसेल तर नवल. मग काय, काहीच क्षणात ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिस पोहोचले. यानंतर पोलिस सनीला अटक करून सोबत घेऊन गेलेत. सनीची हिरोईन अभिनेत्री रुखसार डिल्लन हिलाही पोलिसांनी अटक केली.


‘भंगडा पा ले’ या चित्रपटात सनी कौशलच्या अपोझिट तेलगू अभिनेत्री रूखसार ढिल्लोची वर्णी लागली आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर पंजाबात भंगडा कसा लोकप्रिय झाला, याची ही सुरस कथा आहे. दिग्दर्शक रमेश तुरानींची मुलगी स्नेहा तुरानी हा चित्रपट दिग्दर्शित करतेय. स्नेहा या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनक्षेत्रात पाऊल ठेवतेय. येत्या १३ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतेय. ‘भंगडा पा ले’ या चित्रपटामध्ये सनी डीजे जग्गी सिंगची भूमिका साकारणार आहे. तर रूखसार ही सिमी कोहलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Vicky Kaushal’s brother Sunny arrested for dancing outside Salman and Shah Rukh Khan’s residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.