कौटुंबिक कॉमेडी चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बझ्मी लवकरच सुपरहिट हॉरर कॉमेडी चित्रपट भुलभुलैया २ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. यादरम्यान असं वृत्त आलं की, एकता कपूर तिचे प्रोडक्शन हाऊस बालाजी मोशन पिक्चर्स बॅनरअंतर्गत एक कॉमेडी चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बझ्मी करणार आहेत. या चित्रपटासाठी विकी कौशलला फायनल केल्याचं समजतं आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार, बऱ्याच काळापासून एकता कपूर कौटुंबिक मनोरंजन चित्रपट बनवण्याचा विचार करत होती. याची निर्मिती ती मोठ्या प्रमाणावर करणार असल्याचं समजते आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बझ्मींनी करावं अशी एकताची इच्छा होती आणि आता अनीस बझ्मींनी होकार देखील दिला आहे. असं बोललं जातं की या चित्रपटाचं शूटिंग पुढील वर्षाच्या अखेरीस होणार आहे.


चित्रपटाशी निगडीत लोकांचं म्हणणं आहे की अनीस बझ्मीने एकता कपूरच्या आगामी चित्रपटासाठी मुख्य भूमिकेसाठी अभिनेता विकी कौशलला फायनल केलं आहे. असं बोललं जातंय की या चित्रपटासाठी अनीस बझ्मींसाठी विकी पहिले प्राधान्य होते. इतर भूमिकांसाठी कलाकारांचा शोध सुरू आहे. 


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाची स्क्रीप्ट तयार आहे आणि या चित्रपटात काम करण्यास विकीने होकार दिला आहे. या चित्रपटात तो कॉमिक अवतारात पहायला मिळणार आहे.


सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पहिल्यांदाच एकता व विकी एकत्र काम करताना दिसणार आहेत. सध्या विकी कौशल उधम सिंग बायोपिकमध्ये बिझी आहे.

त्यानंतर तो भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचे सेनाध्यक्ष जनरल सॅम मानेकशॉ यांच्या बायोपिकच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे.
 

Web Title: Vicky Kaushal will be appearing for the first time in the upcoming movie Anis Bazmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.