ठळक मुद्देविकीने काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचा एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोला त्याच्या फॅन्सची खूपच चांगली पसंती मिळत आहे.

विकी कौशल सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असतो. तो त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. हा फोटो त्याच्या लहानपणीचा असून या फोटोत तो खूपच क्यूट दिसत होता. 

विकीने काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचा एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोला त्याच्या फॅन्सची खूपच चांगली पसंती मिळत आहे. तू लहानपणी देखील तितकाच क्यूट दिसायचा असे सोशल मीडियाद्वारे त्याचे चाहते त्याला सांगत आहेत. या फोटोला आतापर्यंत सात लाखांहन अधिक लोकांनी लाईक केले असून अनेकांनी या फोटोवर कमेंट केले आहे. या फोटोसोबत फ्रीज पोटॅटो असे कॅप्शन त्याने लिहिले आहे. कारण या फोटोत तो फ्रिजच्या आत बसलेला आपल्याला दिसत आहे. 

उरी फेम अभिनेता विकी कौशलने 'मसान' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्याच्या सगळ्याच चित्रपटातील भूमिकांनी रसिकांच्या मनावर छाप उमटवली आहे.

रमण राघव', 'मनमर्जिया', 'संजू', 'राझी' आणि 'उरीः द सर्जिकल स्ट्राईक' या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्याचे चित्रपट तिकिटबारीवर देखील यशस्वी ठरले आहेत. विकी कौशलने बॉलिवूडमध्ये आज आपले प्रस्थ निर्माण केले आहे. पण विकीसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टर असले तरी विकीने त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.

Web Title: vicky kaushal childhood picture

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.