ठळक मुद्देजगजीत यांच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता. हा विरोध डावलून दोघांनी लग्न केले. हे बॉलिवूडचे पहिला आंतरधर्मिय विवाह असल्याचे म्हटले जाते.

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे काल रात्री साडेनऊ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. खय्याम यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एक अनमोल हिरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. आज चार बंगला येथील कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात येईल. खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर यांची प्रकृतीही सध्या खालावलेली आहे. 

गत 28 जुलैला खय्याम त्यांच्या आर्मचेअरवरून पडले होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. चार दिवसांनंतर लड शुगर कमी झाल्याने त्यांच्या पत्नी जगजीत  यांनाही रूग्णालयात भरती करावे लागले. त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळालीय. पण खय्याम यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्यासाठी मोठा आघात आहे.

खय्याम आणि जगजीत  यांचा प्रेमविवाह होता. दोघांची लव्ह स्टोरी कुठल्या चित्रपटापेक्षा कमी नाही. पंजाबच्या एका कुटुंबात जन्मलेल्या जगजीत यांना गायिका बनायचे होते. यासाठी त्या मुंबईत आल्या होत्या. त्यादिवशी त्या मुंबईत उतरल्या. याचदरम्यान मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाच्या ओव्हरब्रिजवर कुणीतरी आपला पाठलाग करतेय, असे जगजीत  यांना जाणवले. त्या सावध झाल्या. याक्षणी एक युवक त्यांच्याजवळ आला आणि त्याने आपली ओळख दिली. मी म्युझिक कंपोजर असल्याचे त्याने सांगितले. ही घटना आहे, 1954 सालची. तो युवक म्हणजे दुसरा कुणी नसून खय्याम होते. ओव्हरब्रिजवर दोघांची ओळख झाली, पुढे मैत्री आणि नंतर प्रेम. यानंतर खय्याम आणि जगजीत  यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

जगजीत  यांच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता. हा विरोध डावलून दोघांनी लग्न केले. हे बॉलिवूडचे पहिला आंतरधर्मिय विवाह असल्याचे म्हटले जाते. लग्नानंतर खय्याम यांनी जगजीत  यांना काही चित्रपटा गाण्याची संधी दिली.


Web Title: veteran music composer khayyam passes away when jagjit kaur felt that khayyam was stalking her
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.