ठळक मुद्देमेक्सिकोची व्हेनेसा पोन्स डी लिऑन फुल टाइम मॉडल असून, हा ताज आपल्या डोक्यावर चढवणारी ती पहिली मॅक्सिकन आहे.

मेक्सिकोची व्हेनेसा पोन्स डी लिऑन ही ‘मिस वर्ल्ड २०१८’ ठरली. चीनच्या सान्या शहरात ६८ वी ‘मिस वर्ल्ड २०१८’ स्पर्धा आयोजित केली गेली. गतवर्षी ‘मिस वर्ल्ड’चा ताज आपल्या नावावर करणाऱ्या भारताच्या मानुषी छिल्लरने व्हेनेसाला मिस वर्ल्डचा मुकुट घातला. स्पर्धेतील ११८ स्पर्धकांना मागे टाकत लिऑनने मिस वर्ल्डचा किताब जिंकला. थायलंडची निकोलेन पिशापा उपविजेती ठरली. या स्पर्धेत सहभागी झालेली भारताची अनुकृती वास ही टॉप ३० पर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली. पण टॉप १२ मध्ये तिला आपले स्थान राखता आले नाही.

यंदाची  ‘मिस वर्ल्ड २०१८’चा किताब जिंकणारी व्हेनेसा कोण, कुठली, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असेल. तिचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

तर व्हेनेसा पोन्स डी लिआॅन हिचा जन्म ७ मार्च १९९२ रोजी झाला होता.

ती फुल टाइम मॉडल असून, हा ताज आपल्या डोक्यावर चढवणारी ती पहिली मॅक्सिकन आहे.


या फोटोतील व्हेनेसाचे सौंदर्य कुणालाही भूरळ पाडेल, असेच आहे. सौंदर्य आणि बुद्धी अशा दोन्हींची दैवी देणगी लाभलेली व्हेनेसा २०१४ पासून मॉडेलिंग क्षेत्रात आहे.मिस वर्ल्ड २०१८ च्या टॉप ३० मध्ये भारत चिली, फ्रान्स, बांगलादेश, जपान, मलेशिया, मॉरिशस, मेक्सिको, नेपाळ, न्यूझीलँड, सिंगापूर, थायलँड, युगांडा, अमेरिका, वेनेजुएला आणि व्हिएतनाम या देशांच्या ब्यूटी क्वीन्सने जागा बनवली आहे.


यापूर्वी २०१७ मध्ये मानुषीने मिस वर्ल्डचा ताज जिंकून १७ वर्षांची प्रतीक्षा संपवली होती. त्यापूर्वी भारताच्या प्रियांका चोप्रा हिने २००० मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.

Web Title: As Vanessa Ponce de Leon wins the Miss World 2018 title, here's a look at her never-seen-before photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.