बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी उर्वशी रौतेला दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत पाय रोवण्याचे प्रयत्न करतेय. पण अद्याप तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. नाही म्हणायला तिला चित्रपट मिळतात, पण या चित्रपटातील तिचे बोल्ड सीन्स तेवढेच चर्चेत राहतात. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘पागलपंती’ हा सिनेमा रिलीज झाला. आता उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार उर्वशी न्यू इअर पार्टीमध्ये 1 तास डान्स परफॉर्म करण्यासाठी तिने तबब्ल 3 कोटी रुपयांचे मानधन घेणार आहे. रिपोर्टनुसार आतापर्यंत बॉलिवूडच्या कोणत्याच सेलिब्रेटी केवळ एका तासासाठी ऐवढी मोठी रक्कम आकारली नव्हती. या इव्हेंटमध्ये ती अनेक हिच सॉग्सवर परफॉर्म करताना दिसणार आहे.   


उर्वशी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरचे तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अधिक चर्चेत असतात. सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर करण्याची एकही संधी ती सोडत नाही. इन्स्टाग्रामवर तिचे 2 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.


२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले.


सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. भाग जानी, सनम रे अशा चित्रपटात ती दिसली.

Web Title: Urvashi rautela will take this amount for a one hour performance on new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.