ठळक मुद्दे‘तू पण राखी सावंत बनण्याच्या मार्गावर आहे. पण आणखी एक राखी सावंत आम्ही सहन करू शकणार नाही,’ असे लिहित एका युजरने तिची खिल्ली उडवली आहे.

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी उर्वशी रौतेला दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत पाय रोवण्याचे प्रयत्न करतेय. पण अद्याप तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. नाही म्हणायला तिला चित्रपट मिळतात, पण या चित्रपटातील तिचे बोल्ड सीन्स तेवढेच चर्चेत राहतात. याऊपर रोज नवे बोल्ड फोटो शेअर करून उर्वशी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. सध्या उर्वशी एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. मला ‘आय लव्ह यू’ म्हण अशी लाडीक मागणी करताना ती दिसतेय.
आता ही काय भानगड आहे, ते जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर या व्हिडीओत उर्वशी रौतेला दिल्लीच्या मुलींची मिमिक्री करताना दिसते.

‘या व्हॅलेन्टाईन वीकमध्ये दिल्लीच्या मुली काहीसे असे म्हणतील, तू एकदा आय लव्ह यू म्हण, फक्त एकदा आय लव्ह यू म्हण’, असे कॅप्शन उर्वशी रौतेलाने या व्हिडीओला दिले आहे. व्हिडीओत उर्वशी ‘आय लव्ह यू’ म्हण असा आग्रह करताना दिसतेय.


उर्वशीचा हा मजेशीर व्हिडीओ आत्तापर्यंत 11 लाखांवर लोकांनी पाहिला आहे. काहींना तो आवडला. पण काहींनी मात्र यावरून उर्वशीला चांगलेच ट्रोल केले. काहींनी तर तिची तुलना राखी सावंतसोबत केली.


‘क्या फूंका बहन?’असे एका ट्रोलरने लिहिले आहे. तर अन्य एका ट्रोलर आता बॉलिवूडला दुसरी राखी सावंत मिळणार आहे, असे लिहित ट्रोल केले आहे. एकाने तिला ‘सस्ता गांजा’ अशा शब्दांत ट्रोल केले आहे. ‘तू पण राखी सावंत बनण्याच्या मार्गावर आहे. पण आणखी एक राखी सावंत आम्ही सहन करू शकणार नाही,’ असे लिहित एका युजरने तिची खिल्ली उडवली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: urvashi rautela shares funny video on valentine day gets trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.