Urvashi rautela shared her stunning video on instagram and explained the meaning of her name | सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय उर्वशी रौतेलाचा हा व्हिडीओ, अभिनेत्री सांगितला आपल्या नावाचा अर्थ

सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय उर्वशी रौतेलाचा हा व्हिडीओ, अभिनेत्री सांगितला आपल्या नावाचा अर्थ

उर्वशी रौतेलाचा ग्लॅमरस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.  या व्हिडिओत उर्वशी खूपच सुंदर दिसत आहे.  हा व्हिडिओ शेअर करताना तिने आपल्या नावाचा अर्थही सांगितला आहे.

 या व्हिडिओत उर्वशी कॅट वॉक करताना दिसत आहे.  हा शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'URVASHI = UR (Heart) + VASHI  (Controller) म्हणजे हृदय वश करणे.  उर्वशीने असेही लिहिले आहे की उर्वशी (हार्ट कंट्रोलर) याचा हा अर्थ तिला नुकताच कळला आहे.

चाहत्यांना उर्वशीचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि जोरदार कमेंट्सही देत ​​आहेत. उर्वशी रौतेला लवकरच बायोपिकमध्ये दिसणार आहे.  'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सिरीजमध्ये उर्वशी रणदीप हुड्डाची पत्नी पूनम मिश्राची भूमिका साकारताना दिसणार आहे.  थ्रिलर मालिका पोलिस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्या जीवनातील वास्तविक घटनांवर आधारित आहे.सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली होती.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Urvashi rautela shared her stunning video on instagram and explained the meaning of her name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.