फॅशन आणि स्टाईलबाबत सेलिब्रिटी मंडळी फारच सजग असतात. त्यातच एखादी बड्या व्यक्तीची पार्टी किंवा मोठा इव्हेंट असेल तर सेलिब्रिटी आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळतेय. बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा.

‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सिनेमात फार कमाल दाखवू शकली नाही. पण चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच माहीती आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या आपल्या फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. 

उर्वशी रौतेला आपली फॅशन आणि स्टाईलबाबत बरीच सजग आहे. ती कुठल्याही कार्यक्रमात जाते तिथे आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. रिल लाईफ असो किंवा रिअल उर्वशीच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात. तिने एक व्हिडी शेअर केला आहे. व्हिडीओत तिने एक जॅकेट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी परिधान केलेल्या जॅकेटनेच सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या आहेत.  या जॅकेटची किंमत जवळपास 5 लाख रूपये इतकी आहे. म्हणूनच उर्वशी रौतेला फॅशन दिवा म्हणून संबोधले जाते. तिचा हा जॅकेट पाहून तुम्हालाही तो खरेदी करण्याची इच्छा झाली नसेल तरच नवल… तिने परिधान केलेल्या जॅकेटसारखे अनेक जॅकेट विविध शॉपिंग वेबसाईटवर उपलब्ध आहेत. 


उर्वशी रौतेला तिच्या आगामी 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सीरिजचे शुटिंग करत आहे, यात आम्ही तिला रणदीप हूडा सोबत मुख्य भूमिका साकारताना पाहणार आहोत. उर्वशी रौतेला इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमदान सोबत एका आंतराष्ट्रीय प्रकल्पात काम करणार आहे ज्याचे अजून हि खूप बझ आहे. द्विभाषिक थ्रिलर “ब्लॅक रोज” आणि “तिरुत्तू पायले 2” चा हिंदी रिमेक सारख्या उर्वशी रौतेलाकडे अनेक चित्रपट आहेत.

 

“इंस्पेक्टर अविनाश” ही नीरज पाठक दिग्दर्शित पोलिस अधिकारी अविनाश मिश्राची वास्तविक जीवनाची कथा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उर्वशी रौतेला यांनी जिओ स्टुडिओबरोबर साइन केले आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Urvashi Rautela Makes Jaws Drop in Her Blaser Look Worth Rs 5 Lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.