Urvashi Rautela hot workout 120kg , Video goes viral | जेव्हा 'ही' अभिनेत्री 120 किलोचं वजन उचलत करते वर्कआऊट, व्हिडीओ व्हायरल
जेव्हा 'ही' अभिनेत्री 120 किलोचं वजन उचलत करते वर्कआऊट, व्हिडीओ व्हायरल

कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात.त्यातच काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात.  सध्या अभिनेत्री उर्वशी रौतेलाही जीममध्ये व्यस्त  दिसते. तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या फोटोत ती वर्कआऊट करताना दिसते. हा फोटो तुम्हालाही जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देईल. मात्र तुम्हाला माहिती आहे का उर्वशी 120 किलोंचं वजन उचलून वर्कआउट करते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक पाहिलेला व्हिडीओ ठरला आहे. जवळपास 24 लाखांपेक्षा जास्त लोकांनी उर्वशीचा हा व्हिडीओ पाहिला आहे. उर्वशीच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत.  आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग असल्याचे या व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट होते.


बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी उर्वशी रौतेला दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत पाय रोवण्याचे प्रयत्न करतेय. पण अद्याप तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘पागलपंती’ हा सिनेमा रिलीज झाला होता. उर्वशी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरचे तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अधिक चर्चेत असतात. सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर करण्याची एकही संधी ती सोडत नाही. इन्स्टाग्रामवर तिचे 2 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. 'सिंह साहब - द ग्रेट’ या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. भाग जानी, सनम रे अशा चित्रपटात ती दिसली. 
 

Web Title: Urvashi Rautela hot workout 120kg , Video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.