Urvashi Rautela Cigar Smoke Video Getting Viral On Social Media-SRJ | एका सिगारमुळे उर्वशी रौतेलाची झाली अशी अवस्था,मोठी चुक पडली असती महागात

एका सिगारमुळे उर्वशी रौतेलाची झाली अशी अवस्था,मोठी चुक पडली असती महागात

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. उर्वशीला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. त्यामुळे तिच्या फोटोंचे  चाहते नेहमीच कौतुक करतात. उर्वशीचा एक व्हि़डीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहेत. हा व्हिडीओ थोडा वेगळा आहे. सिगार ओढतानाचा हा व्हिडीओ असून यात ती चुकीच्या पद्धतीने स्मोकिंग करत असल्याचे पाहायला मिळतेय. मुळात एका सिनेमाच्या शूटिंगवेळी तिने हा सिगार ओढला होता. मुळात सिगार कसा ओढायचा याची तिला जराही कल्पना नव्हती त्यामुळे चुकीच्या पद्धतीने तिने सिगार पकडली होता. जळता सिगार चक्क तिच्या अंगावर पडला होता. खुद्द उर्वशीनेच तिने तिच्याकडून कशी चुक झाली हे सांगत हा व्हिडीओ शेअर केला. यात तिने धुम्रपान करणे हानीकारक असल्याचेही सांगायला ती विसरली नाही. 

उर्वशीने नुकतेच एक व्हर्च्युअल डान्स मास्टरक्लासचे आयोजन केले होते. यात डान्स शिकण्यास, वजन कमी करण्यास इच्छूक लोकांसाठी एक मोफत सेशन ठेवण्यात आले होते. या माध्यमातून उर्वशीने सुमारे 1 कोटी 80 लाख लोकांना झुम्बा, लॅअिन डान्स असे सगळे प्रकार शिकवले. यासाठी उर्वशीला 5 कोटींची रक्कम मिळाली, ही सगळी रक्कम तिने गरजुंसाठी दान केली. तूर्तास यासाठी उर्वशीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 उर्वशीने कोरोनाच्या या संकटात झटणा-या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले. या संकटाशी लढणा-या प्रत्येकाचे मी आभार मानते. केवळ राजकीय व्यक्ती, सेलिब्रिटी, पोलिस, डॉक्टर्स, नर्स, स्वच्छता कर्मचारी यांचेच नाही तर सामान्य जनतेचेही मी आभार मानते. कारण या काळात प्रत्येकजण एकमेकांसोबत उभे आहे. कुठलेही दान लहान किंवा मोठे नसते. आपण एकमेकांना साथ देत या आजाराला हरवू शकतो, असे ती म्हणाली.

Web Title: Urvashi Rautela Cigar Smoke Video Getting Viral On Social Media-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.