uri the surgical strike thats how vicky kaushals film beats sanju padmaavat and simmba | ‘उरी’ची संजू’, ‘पद्मावत’,‘सिम्बा’वर मात! तिस-या आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई!!
‘उरी’ची संजू’, ‘पद्मावत’,‘सिम्बा’वर मात! तिस-या आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई!!

ठळक मुद्दे कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटावरही ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ने मात केली आहे.

विकी कौशलच्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड अद्यापही सुरु आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने एका झटक्यात २०१८ मधील तीन सुपरहिट चित्रपटांना मागे टाकत, एक नवा विक्रम रचला आहे. विकी व यामी गौतम यांच्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने तिस-या आठवड्यात एकूण ३५ कोटींची कमाई केली. तिस-या आठवड्यातील कमाईचा हा आकडा ‘संजू’, ‘पद्मावत’ आणि ‘सिम्बा’पेक्षा अधिक आहे.२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंग -दीपिका पादुकोण स्टारर ‘पद्मावत’ने तिस-या आठवड्यात ३१. ७५ कोटींचा बिझनेस केला होता. यापाठोपाठ गतवर्षी जूनमध्ये रिलीज झालेल्या रणबीर कपूर स्टारर ‘संजू’ने तिस-या आठवड्यात ३१.६२ कोटींचा गल्ला जमवला होता. तर रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ने तिस-या आठवड्यांत एकूण २० कोटी कमावले होते. पण ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या तिन्ही चित्रपटांना पछाडत तिस-या आठवड्यात ३५ कोटींचा बिझनेस करत, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटावरही ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ने मात केली आहे.कंगनाचा हा चित्रपट ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ ला मात देईल, असे वाटले होते. पण झाले उलटेच. विकीच्या चित्रपटाने कंगनाच्या चित्रपटाला लोळवले. एकीकडे विकीच्या या चित्रपटाने तिसºया आठवड्यातही धुव्वाधार कमाई केली असताना दुसरीकडे कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ची कमाई रिलीजच्या सातव्या दिवशीचं थंड पडलेली दिसतेय. काल सातव्या दिवशी ‘मणिकर्णिका’ने केवळ ४.२५ कोटींची कमाई केली. कमाईचा आकडा दिवसागणिक घसरत चालला असल्याने कंगनाचा हा चित्रपट आपला बजेटही वसूल करेल की नाही, अशी भीती मेकर्सला सतावू लागली आहे.


Web Title: uri the surgical strike thats how vicky kaushals film beats sanju padmaavat and simmba
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.