कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ९८ वर्षीय दिलीप कुमार यांनी केले हे ट्विट, चाहते म्हणाले - 'काळजी घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 08:36 PM2021-04-23T20:36:16+5:302021-04-23T20:37:13+5:30

दिलीप कुमार बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत.

The tweet was made by 98-year-old Dilip Kumar against the backdrop of increasing corona infection | कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ९८ वर्षीय दिलीप कुमार यांनी केले हे ट्विट, चाहते म्हणाले - 'काळजी घ्या'

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ९८ वर्षीय दिलीप कुमार यांनी केले हे ट्विट, चाहते म्हणाले - 'काळजी घ्या'

googlenewsNext

कोरोना व्हायरसचे संकट पुन्हा देशात वाढताना दिसत आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे आणि कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकंदर परिस्थिती पाहाता कोरोना नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. दरम्यान ९८ वर्षांचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी देखील ट्विट करत सध्याच्या परिस्थितीबद्दल काळजी व्यक्त केली.

दिलीप कुमार ट्विटरवर लिहिले, 'सर्वांसाठी प्रार्थना करत आहे.' त्यांच्या या पोस्टवर चाहते त्यांनाही काळजी घ्यायला सांगत आहेत. दिलीप कुमार सोशल मीडियावर फार कमी सक्रीय असतात. त्यांनी शेवटचे ट्विट २६ मार्च रोजी केले होते.  गेल्या वर्षी कोरोनाचे संकट जेव्हा भारतात दाखल झाले तेव्हा सायरा बानो यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दिलीप कुमार यांना आयसोलेट केले होते. सायरा बानू दिलीप कुमार यांची खूप काळजी घेत असतात. 


दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात जुन्या जोड्यांपैकी एक. सायरा बानो यांनी १९६६ मध्ये वयाच्या दिलीप कुमार यांच्याशी लग्नगाठ बांधली. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या नात्याच्या चर्चा कायम रंगत असतात. सायरा बानो यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, दिलीप हे माझे संपूर्ण आयुष्य आहे. दिलीप कुमार यांचा स्पर्श आणि त्यांची काळजी घेणे माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे.


तसेच काही दिवसांपूर्वी त्या म्हणाल्या, 'माझ्यावर काही दबाव आहे, म्हणून मी दिलीप यांची काळजी घेते, असे नाही. तर मी त्यांच्यावर मनापासून प्रेम करते, म्हणून मी त्यांची काळजी घेते. माझे कुणी कौतुक करावे म्हणून असे अजिबात करत नाही.' 

Web Title: The tweet was made by 98-year-old Dilip Kumar against the backdrop of increasing corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.