पहिला सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकला की त्यानंतर पुढे काय ? असा प्रश्न अनेक नवीन अभिनेत्रींपुढे असतो. कारण बॉलिवूडमध्ये आपण सिनेमात झळकलो की यापुढे भरपूर सिनेमाच्या ऑफर्स मिळतील अशी ब-याच अभिनेत्रींची चुकीची समजूनत असत. मात्र असे होत नाही आणि परिणामी चांगल्या संधीची वाट पाहातच वेळ निघून जातो. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी एक सिनेमा केल्यानंतर लग्न करत बॉलिवूडपासून दूर गेल्या. याच यादीत अभिनेत्री संदली सिन्हाचाही समावेश आहे. 


अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'तुम बिन सिनेमा'त संदली झळकली होती. या सिनेमाच्या यशानंतर संदलीकडे सिनेमांची भलीमोठी यादी अपेक्षित होती. मात्र या सिनेमानंतर ती फारसी सिनेमात झळकली नाही. ‘पिंजर’ आणि ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ या सिनेमात तर तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती.

 


अखेर २००५ साली बिझनेसमन किरण सालस्करसह विवाबंधनात अडकत तिने आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली. झगमगत्या दुनियेपासून लांब जात सध्या ती आपल्या कुटुंबासह एन्जॉय करत आहे. संदलीला दोन मुलंही आहेत. सिनेमात झळकत नसली तरी संदली कोट्यावधीची मालकीन आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. देशातील सर्वात मोठी बेकरी   ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ची ती मालकीन असून ती आता फक्त ती बिझनेसवरच लक्ष केंद्रित करत आहे. 


 

Web Title: Tum Bin's Movie Actress Sandali Sinha Has No Film, No Ads, No Tv Show, Then Also She is Millionaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.