Transgende activist Laxmi Narayan Tripathi praises Akshay Kumar film Laxmi Bomb trailer | 'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर पाहून काय म्हणाल्या ट्रान्सजेंडर लक्ष्मी नारायण त्रिपाठी? बघा व्हिडीओ...

'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर पाहून काय म्हणाल्या ट्रान्सजेंडर लक्ष्मी नारायण त्रिपाठी? बघा व्हिडीओ...

अक्षय कुमारच्या आगामी बहुचर्चीत 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाचा ट्रेलर सध्या गाजतो आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारलेला अक्षय कुमार करिअरमध्ये पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. या सिनेमाचा ट्रेलर ट्रान्सजेंडर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनीही पाहिला आणि त्यांना हा ट्रेलर खूप आवडला. त्यांनी या सिनेमाचा ट्रेलर पाहून एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. 

लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडीओ शेअर केला. त्या त्यांनी सांगितले की, 'धमाका करण्यासाठी लक्ष्मी येतीये. फार चांगलं वाटतं हे ऐकून की, माझंही नाव लक्ष्मी आहे. मी आता हा ट्रेलर पाहिला. मी लक्ष्मी बॉम्बच्या ट्रेलरची वाट बघत होते. माइंड रिफ्रेश झाला आज ट्रेलर बघून. मी अक्षय कुमारजी आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देते ज्यांनी इतका सुंदर सिनेमा तयार केला आणि ट्रेलरही. हा सिनेमा किती चांगला असेल हे आताच समजतंय. थॅंक्यू'. (PHOTOS: 'लक्ष्‍मी बॉम्‍ब'चा दमदार ट्रेलर झाला रिलीज, घाबरवण्याऐवजी हसविताना दिसला अक्षय कुमार)

अक्षयने दिला रिप्लाय

लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचा हा व्हिडीओ रिट्विट करत अक्षय कुमारने लिहिले की, 'हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. इतकं प्रेम देण्यासाठी खूप आभार. एका लक्ष्मीकडून दुसऱ्या लक्ष्मीला धन्यवाद. नाव खरंच खूप खास आहे'. (सुपरहिट 'कंचना'चा रिमेक आहे 'लक्ष्मी बॉम्ब', राघव लॉरेन्सने साकारलेल्या भूमिकेला अक्षय कुमार देणार का टक्कर?)

कधी होणार सिनेमा रिलीज

'लक्ष्मी बॉम्ब' या सिनेमाचं दिग्दर्शन राघव लॉरेंसने केलं आहे. अक्षय कुमार आणि कियारा अडवाणीसोबतच सिनेमात शरद केळकर तरूण अरोरा, अश्विनी काळसेकर मीर सरवर, बाबू एंटोनी आणि तुषार कपूर यांच्याही महत्वाच्या भूमिका असणार आहेत. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा सिनेमा तमिळ 'कंचना' सिनेमाचा रिमेक आहे. कंचना हा सिनेमा राघव लॉरेंस याने लिहिला, दिग्दर्शित केला आणि मुख्य भूमिकाही साकारली होती. (‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर रिलीज होताच अक्षय कुमार झाला ट्रोल, लोकांनी म्हटले ‘डरपोक’!!)

काही लोक नाराज....

‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरमध्ये असे काय आहे की, लोक नाराज झालेत, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे कारण आहे मेकर्सचा नवा फंडा. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्री लोकांच्या आधीच निशाण्यावर आहे. गेल्या काही दिवसांत नवा ट्रेलर रिलीज होताच त्याला लाईक्स ऐवजी डिसलाईक्स मिळत आहेत. अलीकडे आलिया भटचा ‘सडक 2’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला, त्यावेळी हेच चित्र दिसले होते. लोकांनी या ट्रेलरवर डिसलाईक्सचा भडीमार केला होता. या नकारात्मक प्रतिसादातून बॉलिवूडबद्दलचा लोकांचा संताप व्यक्त झाला होता. अशात अक्षय व ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या मेकर्सनी यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काय करावे तर युट्यूबवर लाइक-डिसलाईकचे आॅप्शनच ‘प्रायव्हेट’ केले. यामुळे या ट्रेलरला मिळणारा रिस्पॉन्स लोक बघू शकले नाहीत. याच कारणामुळे अनेकांनी अक्षय व ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या मेकर्सला ट्रोल करणे सुरु केले. भित्रे, डरपोक अशा काय काय प्रतिक्रिया लोक देत आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Transgende activist Laxmi Narayan Tripathi praises Akshay Kumar film Laxmi Bomb trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.