बॉलिवूडचा एक्शन व डान्सिंग स्टार टायगर श्रॉफने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. त्याचा देशभरात खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्याची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि तिचाही फॅन फॉलोविंग खूप आहे. नुकतीच कृष्णा उशीरा रात्री मिस्ट्री बॉयसोबत दिसली. 


इंस्टाग्राम अकाउंटवर विरल भय्यानीने एअरपोर्टवरील काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा एका व्यक्तीसोबत स्पॉट झाली. त्या व्यक्तीने कृष्णाच्या खांद्यावर हात ठेवलेला पहायला मिळतो आहे. 


कृष्णा श्रॉफसोबत दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे इबन ह्याम्स. इबन प्रोफेशनल बास्केटबॉल प्लेअर आहे. तर विकीपीडिया नुसार इबनकजे ऑस्ट्रेलिया, इज्राईल व भारताचं नागरिकत्व आहे.


कृष्णाला भाऊ टायगर व वडील जॅकी श्रॉफ यांच्यासारखं बॉलिवूडमध्ये अजिबात रस नाही. मात्र कृष्णा फिटनेस फ्रिक आहे आणि ती सोशल मीडियावर नेहमी फिटनेसशी संबंधित फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.


फिटनेससोबत कृष्णाला टॅटू काढण्याचा छंद आहे. कृष्णाने तिच्या मनगटावर स्टारचा टॅटू काढला आहे. तर हातावर गॉडमदरचा टॅटू काढला आहे.

एका मुलाखतीत कृष्णानं सांगितलं होतं की, मला माझ्या मर्यादा माहित आहे. माझे दोन फ्रेंड आहेत. ज्यांना जवळपास २० वर्षांपासून मी ओळखते.

Web Title: Tiger Shroff Sister Krishna Shroff Spotted With Mystery Boy Eban Hyams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.