'स्टुडंट ऑफ द ईयर २'चा अभिनेता टायगर श्रॉफ व स्लो मोशन गर्ल दिशा पटानी बऱ्याचदा डिनर डेट किंवा मुव्ही डेटवर जाताना दिसतात. हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याचदा होताना दिसते. अद्याप त्या दोघांनी त्यांच्या रिलेशनशीपबद्दल खुलासा केलेला नाही. मात्र त्या दोघांचे बॉण्ड पाहून ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचं वाटतं.

आता ते दोघे बऱ्याचदा डिनर किंवा लंच डेटवर जातात म्हटल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की त्यांचं बिल कोण भरत असेल? मात्र टायगर श्रॉफने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. टायगरचे उत्तर ऐकून तुम्ही खूश व्हाल.

टायगर श्रॉफ म्हणाला की, 'आमचे लंच किंवा डिनर डेट फ्रेंडली असून आम्ही आळीपाळीनं बिल भरतो. त्याने पुढे सांगितलं की, सुरुवातीला मीच बिल भरायचो. पण नंतर दोघांनी आळीपाळीने बिल भरायचं ठरवलं. आधी अनेकदा मीच बिल भरलं होतं. पण दिशाला ते आवडत नाही. तेव्हापासून एकदा मी व एकदा ती असे बिल भरतो.'


दिशा व टायगरने रिलेशनशिप असल्याचं कधीच अधिकृतपणे जाहीर केलं नाही. मध्यंतरी त्यांचे ब्रेकअप झाल्याच्याही चर्चा होत्या.

तर मध्यंतरी दिशा ही युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिसली होती. त्यावेळीदेखील दिशा चर्चेत आली होती. 


Web Title: Tiger Shroff reveals who pays the bill on his dinner dates with Disha Patani
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.