ठळक मुद्देटायगर आणि रिनजिंग यांच्यात लहानपणापासून मैत्री असून आजही त्याची मैत्री कायम आहे.

सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल झाला असून त्या फोटोत आपल्याला दोन लहान मुलांना पाहायला मिळत आहेत. ही दोन्ही मुले अतिशय गोंडस असून या मुलांचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे. ही दोन मुलं बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेत्यांची मुले आहेत आणि यातील एकाने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये एंट्री केली असून आज तो तरुणांच्या हृदयातील ताईत बनला आहे. जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ आणि डॅनी डेन्झोपाचा मुलगा रिनजिंग यांचा हा फोटो असून हा फोटो टायगरच्या चाहत्यांना चांगलाच आवडत आहे.

जॅकी श्रॉफ आणि डॅनी यांनी अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र देखील काम केले आहे. जॅकी आणि डॅनी हे खऱ्या आयुष्यात खूप चांगले फ्रेंड्स असून त्यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलांमध्ये देखील खूप चांगली मैत्री आहे. टायगर आणि रिनजिंग यांच्यात लहानपणापासून मैत्री असून आजही त्याची मैत्री कायम आहे.

पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये टायगर दिसत असून त्याच्या चेहऱ्यावर खूपच छान स्माईल पाहायला मिळत आहे. या फोटोत टायगर खूपच क्यूट दिसत असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट केले असून टायगरच्या स्माईलचे ते कौतुक करत आहेत.

टायगरचा वॉर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात त्याच्यासोबत हृतिक रोशन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टायगर श्रॉफचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे. टायगरचे टायगर हे नाव कसे पडले, याचीही एक फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. टायगरचे टायगर हे नाव पडण्यामागे त्याची लहानपणीची एक सवय कारणीभूत आहे. होय, लहानपणी टायगरला चावायची सवय होती. तो सगळ्यांना चावत सुटायचा. जॅकी श्रॉफ यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. टायगरच्या त्याच्या बालपणी किती मस्तीखोर होता हे आपल्याला यावरून नक्कीच कळत आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tiger Shroff looks adorable in childhood photo with BFF Rinzing Denzongpa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.