टायगर श्रॉफचा अ‍ॅक्शन व्हिडीओ व्हायरल, एका तासात मिळाले 11 लाख व्ह्युज !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 02:48 PM2021-02-04T14:48:13+5:302021-02-04T14:50:56+5:30

टायगरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर बर्‍याचदा व्हायरल होतात.

Tiger shroff has shared a video of his new stunt on instagram | टायगर श्रॉफचा अ‍ॅक्शन व्हिडीओ व्हायरल, एका तासात मिळाले 11 लाख व्ह्युज !

टायगर श्रॉफचा अ‍ॅक्शन व्हिडीओ व्हायरल, एका तासात मिळाले 11 लाख व्ह्युज !

googlenewsNext

कमी वेळात आपल्या दमदार डान्स आणि धमाकेदार अ‍ॅक्शनच्या जोरावर चाहत्यांना वेड लावणारा टायगर श्रॉफ सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असतो.  टायगरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर बर्‍याचदा व्हायरल होतात. टायगर पुन्हा एकदा त्याच्या सोशल मीडिया शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. टायगरने नुकताच इन्स्टाग्रामवर एक अ‍ॅक्शन व्हिडीओ शेअर केला आहे जो तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफ किक मारण्यापूर्वी मिड-एअर फ्लिप करतोय आणि ट्रिपल किक मारतोय. टायगरचा हा लहानसा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. टायगरने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर एका तासांत त्याला 11 लाखाहून अधिक व्हुज आलत. चाहत्यांसह सेलिब्रेटीही या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

या व्हिडिओ शेअर करताना टायगरने त्याला मजेशीरल कॅप्शन दिले आहे. टायगरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'काही मुव्ह्ज व्हिडीओ गेममध्ये करणंच का सोप्प असते.'

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर टायगर श्रॉफ 'गणपत' शिवाय 'गणपत २' मध्ये दिसणार आहे. तसेच हिरोपंतीचा सीक्वल येणार असल्याचेही समजते आहे. यात त्याच्यासोबत क्रिती सनॉन दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करणार आहे. पुढील वर्षी जुलैमध्ये चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त टायगर रॅम्बोमुळे चर्चेत आहे. मात्र हा चित्रपट अंडर प्रोडक्शन आहे. त्यामुळे या चित्रपट बनण्यासाठी अजून अवकाश आहे

Web Title: Tiger shroff has shared a video of his new stunt on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.