Three scripts of Munna Bhai 3 are already in place says Arshad Warsi | 'मुन्नाभाई 3' च्या स्क्रीप्ट आहेत तयार, अरशद वारसी म्हणजे सर्किटने केला खुलासा.....

'मुन्नाभाई 3' च्या स्क्रीप्ट आहेत तयार, अरशद वारसी म्हणजे सर्किटने केला खुलासा.....

संजय दत्त आणि अरशद वारसी यांच्या 'मुन्ना भाई' सीरीजचे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांना आवडले होते. आता फॅन्सना या सीरीजच्या तिसऱ्या सिनेमाची आतुर झाले आहेत. पण याबाबत अजून निर्माते विधु विनोद चोप्रा आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी काहीही कन्फर्म केलेलं नाही. मात्र, अरशद वारसीने सांगितलं की, या सीरीजच्या तिसऱ्या सिनेमासाठी आतापर्यंत ३ स्क्रीप्ट लिहिल्या गेल्या आहेत.

अभिनेता अरशद वासरीने सांगितले की, 'मुन्ना भाई 3' साठी ३ स्क्रीप्ट फायनल केल्या आहेत. पण ते हे सांगू शकत नाही की, या सिनेमाचं शूटींग केव्हा सुरू होईल. या सारीजमधील पहिला सिनेमा 'मुन्नाभाई एमबीबीएस' २००३ मध्ये रिलीज झाला होता. हा सिनेमाचा चांगलाच गाजला. त्यानंतर २००६ मध्ये याचा सीक्वेल 'लगे रहो मुन्नाभाई' रिलीज झाला होता. हा  सिनेमाही लोकांमध्ये चांगलाच गाजला होता. 

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये अशी बातमी समोर आली होती की, मुन्नाभाई सीरीजच्या तिसऱ्या सिनेमाची आयडिया फायनल झाली आहे. तरी सुद्धा यावर्षी या सिनेमाचं शूटींग सुरू झालेलं नाही. तसा यावर्षी संजय दत्तनेही कॅन्सरमुळे कमीच काम केलं. आता अशी आशा केली जात आहे की, पुढील वर्षी या सिनेमाचं शूटींग सुरू होऊ शकतं.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Three scripts of Munna Bhai 3 are already in place says Arshad Warsi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.