गलती तो उन्हीं से होती है...निकम्मों की ज़िंदगी तो...! ‘इमेज बिल्डिींग’ टीकेनंतर अनुपम खेर यांचे ‘डॅमेज कंट्रोल’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 12:52 PM2021-05-14T12:52:12+5:302021-05-14T12:55:52+5:30

Anupam Kher tweet :  काल-परवा एका मुलाखतीत अनुपम यांनी केंद्रावर ताशेरे ओढले होते. आज अनुपम यांनी सहा ओळींची एक कविता पोस्ट केली.

Those Who Work Make Mistakes : Anupam Kher tweet After Image-Building comment on modi government | गलती तो उन्हीं से होती है...निकम्मों की ज़िंदगी तो...! ‘इमेज बिल्डिींग’ टीकेनंतर अनुपम खेर यांचे ‘डॅमेज कंट्रोल’!!

गलती तो उन्हीं से होती है...निकम्मों की ज़िंदगी तो...! ‘इमेज बिल्डिींग’ टीकेनंतर अनुपम खेर यांचे ‘डॅमेज कंट्रोल’!!

googlenewsNext
ठळक मुद्देयाआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका करणा-यांना अनुपम खेर यांनी ‘आएगा तो मोदीही’ अशा शब्दांत उत्तर दिले होते.

कोरोना साथीचा मुकाबला करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अपयशी ठरले, अशी टीका कुणी केली तर अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher ) यांनी. त्यांनी केवळ टीकाच केली नाही तर, इमेजपेक्षा सध्या लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत, असेही मोदी सरकारला सुनावले. अनुपम खेर मोदी सरकारचे कट्टर समर्थक मानले जातात. साहजिकच त्यांच्या ‘जहरी’ टीकेने सर्वांच्या भुवया उंचावल्या. पण यानंतर आज अचानक अनुपम यांनी एका कवितेतून सारवासारव करताना दिसले. ( Actor Anupam Kher tweeted a six-line poem in Hindi)

आज अनुपम यांनी सहा ओळींची एक कविता पोस्ट केली.
‘गलती उन्हीं से होती है
जो काम करते है
निकम्मों की जिंदगी तो
दुसरों की बुराई खोजने में ही खत्म हो जाती है,’ असे ट्विट त्यांनी केले.
त्यांच्या या ट्विटनंतर हा ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाल्यावाचून राहिला नाही.

काय म्हणाले होते अनुपम खेर
काल-परवा एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अनुपम यांनी केंद्रावर ताशेरे ओढले होते. कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यात मोदी सरकारला अपयश आले असून, त्यासाठी त्याला जबाबदार धरले पाहिजे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी पुरेशा सुविधा उभारण्यात या सरकारला अपयश आले. त्यामुळे याप्रकरणी होणारी टीका रास्त आहे. कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याने त्यांचे होणारे हाल, त्यामुळे नातेवाइकांची होणारी घालमेल, कोरोना रुग्णांचे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडून दिल्याचा उघडकीस आलेला प्रकार या घटनांनी देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अनुपम खेर अनुपम यांनी केंद्रावर ताशेरे ओढले होते  केवळ असंवेदनशील व्यक्तीच अशा घटनांनी हेलावणार नाही. कोरोना रुग्णांचे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडून देणे ही घटना भीषण आहे. मात्र, इतर राजकीय पक्षांनी या घटनेचा राजकीय स्वाथार्साठी वापर करणे हेदेखील अयोग्य आहे. सध्या इमेज नाही तर लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत, असे अनुपम म्हणाले होते.

आएगा तो मोदीही...
विशेष म्हणजे, याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका करणा-यांना अनुपम खेर यांनी ‘आएगा तो मोदीही’ अशा शब्दांत उत्तर दिले होते. यावरून अनुपम खेर जबरदस्त ट्रोलही झाले होते.

Web Title: Those Who Work Make Mistakes : Anupam Kher tweet After Image-Building comment on modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.