बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली, यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. त्याच्या मृत्यूसाठी कुणी घराणेशाहीला जबाबदार धरत आहे तर कुणी डिप्रेशनमुळे त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील राजनीती, घराणेशाही आणि होणाऱ्या भेदभावाबद्दल कलाकार उघडपणे बोलत आहेत. काही अभिनेत्रींनी त्याला आलेल्या वाईट अनुभवाबद्दलही सांगितले. त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री व बिग बॉस 7 फेम सोफिया हयात हिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

एका मुलाखतीत सोफिया म्हणाली, 'सिनेइंडस्ट्रीत नेपोटीझम बऱ्याच कालावधीपासून आहे. परदेशी असल्यामुळे मला त्रास सहन करावा लागला आहे. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या निर्मात्यांनी मला कामासाठी आमंत्रण दिले. डायरी ऑफ बटरफ्लाय या सिनेमात मला कास्ट करण्यात आले होते. नंतर मोठ्या कलाकार आणि निर्मात्यांनी माझ्यावर चान्स मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना शारीरिक तडजोड हवी होती. मी कधी त्यांच्या हाती सापडले नाही. सतत मला अप्रोच केले जात होते पंरतु कामाच्या तासांव्यतिरीक्त मी कधीच त्यांना भेटले नाही.'

पुढे सोफिया म्हणाली, 'त्यांचे न ऐकल्यामुळे मला मिळणारे काम इतर मुलींना दिले जाऊ लागले. चित्रपटातून माझे सीन्स कापले जाऊ लागले. यानंतर मी माझ्या देशात परतण्याचा निर्णय घेतला. मला नेपोटीझमची शिकार नव्हते व्हायचे.'


सोफिया हयातच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर 2002 मध्ये सोफियाने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले होते. हॉलिवूडपटांव्यतिरीक्त सोफिया हिंदी चित्रपटामध्येही दिसली आहे. भारतात बिग बॉस 7 मुळे प्रचलित झाली होती. यानंतर तिने काही सिनेमातही काम केलं आहे.

सोफियानं बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्डमधून एन्ट्री केली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ‘They wanted a physical compromise, I even tried to sell it’, the actress’s shocking revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.