ठळक मुद्दे2012 मध्ये अनीता राज पुन्हा चर्चेत आल्या त्या पतीमुळे.

80 चे दशक गाजवणा-या अभिनेत्रींच्या यादीतले एक नाव म्हणजे अनीता राज. अनीता राज दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसल्या नाहीत. पण छोट्या पडद्यावर मात्र आजही त्या सक्रीय आहेत.1981 साली प्रदर्शित ‘प्रेम गीत’ या चित्रपटातून अनीता राज यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आणि एका रात्रीत स्टार झाल्यात. यानंतर अनेक चित्रपटांत त्या झळकल्या.  1992 मध्ये अनीता राज यांनी सुनील हिंगोरानीसोबत लग्न केले. काळासोबत अनीता यांच्या लूकमध्ये प्रचंड बदल झाला. इतका की, आज त्यांना ओळखणेही कठीण होईल.

सुनील हिंगोरानी दिग्दर्शक आहेत. 1985 मध्ये सुनील यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘करिश्मा कुदरत का’ या चित्रपटात अनीता राज लीड रोलमध्ये होत्या. याच चित्रपटाच्या सेटवर सुनील व अनीता यांच्यात प्रेम झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.


 

अनीता यांनी दुल्हा बिकता है, नौकर बीवी का, अच्छा बुरा, जमीन आसमान, जान की बाजी, गुलामी, मोहब्बत की कसम, प्यार किया है प्यार करेंगे अशा अनेक चित्रपटांत काम केले. 2007 मध्ये ‘थोडी लाईफ थोडा मॅजिक’ या चित्रपटात त्या झळकल्या. पण एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्यांनी बे्रक घेण्याचा निर्णय घेतला. मोठ्या ब्रेकनंतर 2012 साली ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक केले. पण हे कमबॅकही फसले. याचकाळात त्यांनी छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. आशिकी, इना मीना डीका, 24 या टीव्ही शोमध्ये त्या शोमध्ये त्यांनी काम केले.

2012 मध्ये अनीता राज पुन्हा चर्चेत आल्या त्या पतीमुळे. होय, एका महिलेने अनीतांच्या पतीवर छेडखानी व धमकी दिल्याचा आरोप केला. सोबतच सोसायटीच्या फंडमध्ये 1 कोटींची अफरातफर केल्याचा आरोपही त्यांच्या पतीवर झाला. याप्रकरणी सुनील यांना अटकही झाली होती.

Web Title: then an now huge transformation in anita raj look in 37 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.