बॉलिवूड नट्यांच्या सौंदर्याच्या चर्चा आजच्या नाहीत. दीर्घकाळापासून या नट्यांच्या अदाकारीने आणि सौंदर्याने सिनेप्रेमींना प्रभावित केले आहे. 90 च्या दशकातील अभिनेत्रींबद्दल बोलायचे तर आजही या अभिनेत्रींचा चार्म कायम आहे. काळासोबत त्यांच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. अशाच काही अभिनेत्री आणि त्यांचे बदललेले लूक्स...

ऐश्वर्या राय बच्चन

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याने अनेकांना वेड लावले. सुंदर नट्यांच्या यादीत आजही तिचे नाव आवर्जुन घेतले जाते. सध्या ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये फारसी अ‍ॅक्टिव्ह नाही. पण तिच्या सौंदर्याच्या चर्चा मात्र आजही होतात आणि होत राहतील.

करिश्मा कपूर

90च्या दशकात सर्वांना आपल्या सौंदर्याने वेड लावणारी करिश्मा कपूर आज अनेक वर्षांनंतरही तितकीच सुंदर दिसते. चेह-यावर वयाचा परिणाम दिसू लागला असला तरी, तिचा चार्म कायम आहे. लवकरच करिश्मा ‘मेंटलहुड’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरीची बातच न्यारी. माधुरी आजही बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिव्ह आहे. वय वाढते पण चेहºयावरचे तेज मात्र आजही कायम आहे.

काजोल

काजोल बॉलिवूडमध्ये आली आणि तिच्या अदाकरीने सर्वांची मने जिंकलीत. आज काजोल बरीच बदलली आहे. सौंदर्य म्हणाल तर काजोल आधीपेक्षाही अधिक सुंदर दिसू लागलीय.

रवीना टंडन

रवीना टंडनने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. आजही ती बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिव्ह आहे. तिचे ग्लॅमर जराही कमी झालेले नाही.

तब्बू

तब्बूने चाळीशी कधीच ओलांडली. पण सौंदर्य म्हणाल तर वयासोबत तेही वाढतेय.

शिल्पा शेट्टी

आधीची शिल्पा आणि आजची शिल्पा पाहून हीच ती हे ओळखणेही कठीण व्हावे. नुकतीच शिल्पा शेट्टी दुस-यांदा आई झाली. सरोगसीद्वारे तिने मुलीला जन्म दिला. 
 

Web Title: then and now looks of 90s bollywood divas aishwarya rai bachchan to kajol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.