बाबो..! बंद खोलीत हा अभिनेता कतरिना कैफला करत होता किस; बिग बींनी पकडले होते रंगेहाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 07:06 PM2022-01-19T19:06:29+5:302022-01-19T19:07:44+5:30

२००३ साली कतरिना कैफ (Katrina Kaif)ने 'बूम' (Boom Movie) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बोल्ड कंटेंटमुळे चर्चेत आला होता.

The actor was kissing Katrina Kaif in a closed room; Amitabh Bachchan was caught red-handed | बाबो..! बंद खोलीत हा अभिनेता कतरिना कैफला करत होता किस; बिग बींनी पकडले होते रंगेहाथ

बाबो..! बंद खोलीत हा अभिनेता कतरिना कैफला करत होता किस; बिग बींनी पकडले होते रंगेहाथ

Next

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) ही टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र, एक वेळ अशी होती जेव्हा तिला इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. २००३ साली कतरिना कैफने बूम (Boom Movie) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दिग्दर्शक कैजाद गुस्ताद यांचा हा चित्रपट बोल्ड कंटेंटमुळे चर्चेत आला होता. या चित्रपटातील एका दृश्यात कतरिनाला गुलशन ग्रोवर (Gulshan Grover) यांच्यासोबत किसिंग सीन करायचा होता. ज्यासाठी त्यांनी सरावही केला होता.

खुद्द गुलशन ग्रोवर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ते किसिंग सीनसाठी खूप घाबरले होते. बंद खोलीत त्यांनी कतरिनासोबत सरावही केला. सराव करत असताना अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्या खोलीत आले आणि त्यांनी हे सर्व पाहिले. त्यावेळी बिग बींनी त्यांना प्रोत्साहन दिले असले तरी गुलशन ग्रोव्हर यांची अवस्था खूपच वाईट झाली होती. कतरिना आणि गुलशन ग्रोव्हर यांच्यावर चित्रीत झालेला हा सीन खूप व्हायरल झाला होता. याबद्दल बोलताना कतरिना म्हणाली होती की, मी हा सीन केलेला नाही हे मी नाकारत नाही. पण मी त्याबद्दल खूप अस्वस्थ होते.

...त्यामुळे इतिहास बनतो - गुलशन ग्रोव्हर
त्याचवेळी गुलशन यांनी असेही म्हटले होते की, आम्ही कलाकार आहोत. ''मी बराच काळ या इंडस्ट्रीत काम करत आहे. मी दिवसेंदिवस प्रगती करत आहे. एखाद्या कलाकाराने कोणतेही काम केले असेल, तर त्यावर माझा विश्वास आहे. त्याचा एखादा फोटो काढला. व्हिडीओ तयार करण्यात आला. त्यामुळे तो इतिहास बनतो. त्यानंतर या गोष्टी दाबून ठेवण्यात काही उपयोग नाही.''

Web Title: The actor was kissing Katrina Kaif in a closed room; Amitabh Bachchan was caught red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app