ठळक मुद्देया फोटोत डावीकडून सगळ्यात पहिल्यांदा अर्जुन कपूर असून त्याच्या बाजूला रिया कपूर बसलेली आहे आणि तिच्या मांडीवर चिमुकली जान्हवी कपूर आहे तर सगळ्याच शेवटी अंशुला आहे.

अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केला असून या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण या फोटोत आपल्याला बॉलिवूडमधील दोन सिताऱ्यांना पाहायला मिळत आहेत. अंशुलाने तिच्या भावंडांसोबतचा तिचा लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून या फोटोत चिमुकली जान्हवी कपूर, अर्जुन कपूर, रिया कपूर आणि अंशुला कपूर दिसत आहे. 

अंशुलाने शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला चार जण पाहायला मिळत आहेत. या फोटोतील हे चिमुकले कोण कोण आहेत याविषयी प्रत्येकजण सोशल मीडियावर तर्क लावत आहेत. या फोटोत डावीकडून सगळ्यात पहिल्यांदा अर्जुन कपूर असून त्याच्या बाजूला रिया कपूर बसलेली आहे आणि तिच्या मांडीवर चिमुकली जान्हवी कपूर आहे तर सगळ्याच शेवटी अंशुला असून तिच्या चेहऱ्यावर खूपच छान हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. 

अंशुला आणि अर्जुन बोनी कपूर आणि मोना कपूर यांची मुले असून त्यांच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले तर जान्हवी ही अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. अर्जुन, अंशुला आणि जान्हवी यांच्यात पूर्वी मदभेद होते. पण श्रीदेवी यांच्या निधनानंतर अंशुला आणि अर्जुन यांनीच जान्हवी आणि खुशी यांना सांभाळले तर रिया कपूर ही अभिनेता अनिल कपूरची मुलगी असून सोनम कपूरची बहीण आहे.

अर्जुन कपूरने इश्कजादे या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या तो त्याच्या चित्रपटांपेक्षा मलायका अरोरासोबत असलेल्या अफेअरमुळे अधिक चर्चेत आहे तर जान्हवीने धडक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. आता ती द कारगिल गर्ल, तख्त यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. 


Web Title: That's Arjun, Anshula, Janhvi And Rhea Kapoor In This Pic. Guess Who's Who?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.