अभिनेत्री तारा सुतारिया लवकरच 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत टायगर श्रॉफ व अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तारा सध्या या चित्रपटामुळे व खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तारा व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. आता सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या अफेयरच्या वृत्तावर तारा सुतारीयाने चुप्पी तोडली आहे. 

नुकतेच पत्रकारांशी बोलताना ताराला सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या रिलेशनशीपबाबत विचारले असता तिने सांगितले की, 'आम्ही दोघे एकमेकांना डेट करत नाही आहोत. आम्ही एकमेकांचे शेजारी आहोत. शेजारी असल्यामुळे आमच्यात प्रेम आहे. पण त्याचा अर्थ तो नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत.' ताराने असे उत्तर देऊन सिद्धार्थसोबत अफेयरमध्ये नसल्याचा खुलासा केला.

तारा सुतारियाचा 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपट येत्या १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप बिझी आहे. नुकताच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अहमदाबादमध्ये जातानाचा विमानातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती घाबरलेली दिसते आहे आणि प्रार्थना करताना दिसते. शेअर केलेल्या व्हिडिओत तारा सुतारिया विमानात डोळे बंद करून आणि हात जोडून प्रार्थना करताना दिसणार आहे. तिच्या चेहऱ्यावर भीती पहायला मिळते. जेव्हा ती डोळे उघडत नव्हती तेव्हा कॅमेरा तिच्या बाजूला बसलेली अनन्या पांडेकडे जातो आहे. तारा सांगते की, 'तिला एअर टर्ब्युलेन्सची भीती वाटते. म्हणून ती प्रार्थना करते.'

या व्यतिरिक्त तारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा 'मरजावां' चित्रपटात एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटातील त्यांच्या केमस्ट्रीबद्दल ताराला विचारल्यावर ती म्हणाली फायरवर्क्स आहे. या दोन्ही चित्रपटाशिवाय तारा अहान शेट्टीसोबत 'आरएक्स १००' चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: Tara Sutariya disclosed about relation with Siddharth Malhotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.