ठळक मुद्देताराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे तिचा ‘मरजावां’ हा सिनेमा रिलीज झाला. यानंतर ती ‘तडप’ या सिनेमात दिसणार आहे. 

करण जोहरच्या ‘स्टुडंट  ऑफ द ईअर 2’मधून बॉलिवूड डेब्यू करणारी तारा सुतारिया सध्या जाम चर्चेत आहेत. होय, तारा आणि आदर जैन यांचे लव्हलाईफ आता बरेच पुढे गेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तारा आणि करिना कपूरचा चुलत भाऊ आदर जैन या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. तारा व आदर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेत. साहजिकच यानंतर तारा व आदर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. आदरचा मोठा भाऊ अरमान जैन याच्या रोका सेरेमनीत तारा दिसली आणि या चर्चांना आणखी बळ मिळाले. आता या लव्हबर्डनी न्यू ईअर सेलिब्रेशनचा प्लान केला आहे.  दोघेही लंडनमध्ये  न्यू ईअर साजरे करणार आहेत.
सध्या तारा व आदर लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. 22 डिसेंबरला दोघेही मुंबईवरून लंडनला रवाना झाले होते. येथे त्यांनी ख्रिसमस साजरा केला आणि आता न्यू ईअरचे सेलिब्रेशनचा त्यांचा प्लान आहे. ताराच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून ती सध्या लंडनमध्ये असल्याचे सिद्ध होते.

अलीकडे तारा व आदर यांनी एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली होती. होय, आदरने  मुंबईतील ‘युटू’ या आयरिश बँडच्या परफॉर्मन्सचा एक व्हिडीओ शेअर केला होता. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ शेअर करताना त्याने ताराला टॅग केले होते. इतकेच नाही तर ‘जेव्हा मी तुझ्या सोबत असतो...,’असेही त्याने लिहिले होते.  यावर तारानेही ‘नेहमी तुझ्यासोबत...’असे लिहित आदरचा हा व्हिडीओ लगेच रिशेअर केला होता. 

यापूर्वी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत तारा आदरबद्दल बोलली होती. आम्ही एकमेकांची कंपनी खूप एन्जॉय करतो, असे तारा या मुलाखतीत म्हणाली होती. 

ताराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे तिचा ‘मरजावां’ हा सिनेमा रिलीज झाला. यानंतर ती ‘तडप’ या सिनेमात दिसणार आहे. 

Web Title: tara sutaria aadar jain new year celebration in london together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.