बॉलिवूडची पिंक गर्ल म्हणजेच अभिनेत्री तापसी पन्नू हिने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. आता नुकताच तिचा साँड की आँख हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात तिने शार्पशूटर दादीची भूमिका साकारली होती. या भूमिकेचं सर्वत्र खूप कौतूक झालं. गत १५ फेब्रुवारी २०२०ला आसामच्या गुवाहाटीमध्ये फिल्मफेअर २०२०चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अभिनेत्री तापसी पन्नूला ‘सांड की आंख’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रिटीक अवॉर्ड फॉर बेस्ट अ‍ॅक्टर (फिमेल) पुरस्कार देऊन तिला गौरविण्यात आले. या पुरस्कारासह तापसीच्या गेटअपने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

फिल्मफेअर २०२०च्या पुरस्कार सोहळ्यात तापसीने बटरफ्लायच्या डिझाईनमधील आऊटफिट परिधान केले होते. या आऊटफिटमध्ये ती खूपच स्टनिंग दिसत होती. तिच्या या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तापसी पन्नू ही व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पण अचानक ती मॉडेलिंगकडे वळली. यानंतर तिला अभिनयाचे क्षेत्र खुणावू लागले. तेलगू चित्रपटसृष्टीतून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले

. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशानंतर ती बॉलिवूडकडे वळली. तिने चष्मे बद्दूर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. पिंक या चित्रपटामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते.

या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले. तिने आजवर नाम शबाना, जुडवा 2, मुल्क, बदला यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

 

Web Title: Tapasi Pannu appeared in Butterfly Look! The photo is going viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.