बॉलिवूडमध्ये मीटू चळवळ सुरू करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताचं परदेशात मन लागत नाही आहे. पुन्हा एकदा तिला बॉलिवूडमध्ये आपलं लक्ष केंद्रीत करायचं आहे आणि त्यासाठी तिने प्रयत्नदेखील सुरू केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, तनुश्री दत्ताला हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. पण तिला कमबॅकसाठी दमदार भूमिका हवी आहे. त्यासाठी तिने काही स्टोरी शॉर्टलिस्ट देखील केल्या आहेत. 

गेल्या एका वर्षात सिनेइंडस्ट्रीतील महिला कर्मचारी व कलाकारांचे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषणाच्या प्रकरणात खूप मोठा बदल झालेला पहायला मिळाला आहे. जवळपास सर्व चित्रपट संघटनांनी महिलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी कडक धोरण अवलंबले आहे.

हॉर्न ओके प्लीज चित्रपटाच्या शूटिंगवेळी तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर यावर खूप वादविवाद झाले होते. तसेच आणखीन सिनेइंडस्ट्रीतील काही प्रकरणं समोर आली. मात्र अद्याप नाना पाटेकर यांच्यावर लावलेले आरोप सिद्ध झाले नाहीत. 


मीटू प्रकरणाचा आता जोर कमी झाला असून आता तनुश्री दत्ता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही लोकांनी तनुश्रीला काम देण्याचे आश्वासन दिलं आहे. अद्याप याबाबत अधिकृत काहीही समजू शकलेलं नाही.

मात्र तनुश्रीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तनुश्री यावर्षी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे आणि तिच्या कमबॅकसाठी ती चांगल्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे.


आता तनुश्री दत्ता कोणत्या चित्रपटात झळकणार, हे पाहणं कमालीचं ठरणार आहे.


 

Web Title: Tanushree Dutta Preparing For Her Comeback In Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.