Tamil actor Thavasi passes away in Madurai hospital | कॅन्सरशी झुंज संपली, तामिळ अभिनेते थवासी यांचे निधन

कॅन्सरशी झुंज संपली, तामिळ अभिनेते थवासी यांचे निधन

ठळक मुद्देथवासीने साऊथ इंडस्ट्रीत जवळपास 3 दशकांच्य करिअरमध्ये अनेक सिनेमात सहाय्यक भूमिका साकारल्या.

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्यासारख्या दिग्गजासोबत काम करणारे तामिळ अभिनेते थवासी यांचे सोमवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी सुरु असलेली त्यांची झुंज अखेर संपली. वयाच्या 60 व्या वर्षी थवासी यांनी अखेरचा श्वास घेतला.
सरवनन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पीटलचे एमडी डॉ. वी. सरवनन यांनी ही माहिती दिली. थवासी यांना अन्ननलिकेचा कॅन्सर होता. 11 नोव्हेंबरला त्यांना रूग्णालयात आणले गेले होते. 23 नोव्हेंबरला त्यांना आपातकालीन कक्षात हलवण्यात आले. सोमवारी रात्री 8 वाजता श्वास थांबल्याने त्यांचे निधन झाले.

उपचारांसाठी नव्हते पैसे, लोकांना मागितली होती मदत
अखेरच्या दिवसांत थवासी एका एका पैशासाठी मोताद झाले होते. कर्करोगाशी झुंज देत असलेल्या थवासीजवळ उपचारासाठीही पैसे नव्हते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.

थवासींनी एक व्हिडीओ शेअर केला होता.  एकेकाळी पिळदार शरीराचे थवासी यांचे शरीर कर्करोगाने खंगले होते. व्हिडीओत त्यांची स्थिती बघून चाहते हळहळले होते.  
थवासींनी साऊथ इंडस्ट्रीत जवळपास 3 दशकांच्य करिअरमध्ये अनेक सिनेमात सहाय्यक भूमिका साकारल्या. कीजहक्कु चीमाईले, अन्नथा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 

एकेकाळी पिळदार शरीर असलेल्या या अभिनेत्याची अशी झालीये अवस्था, उपचारासाठीही नाहीत पैसे

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tamil actor Thavasi passes away in Madurai hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.