ठळक मुद्देभारत या चित्रपटामध्ये माझी भूमिका खूपच छोटी आहे. या चित्रपटातील केवळ एकाच दृश्यात मी दिसणार आहे. त्यामुळे याबाबत मी काय बोलणार... म्हणूनच मी या चित्रपटाच्या कोणत्याही प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होणार नाहीये. 

तब्बूचादे दे प्यार दे हा चित्रपट आज प्रदर्शित झाला असून या चित्रपटात तिच्यासोबतच अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन तब्बू आणि या चित्रपटाची टीम करत आहे. पण त्याचसोबत तिचा भारत हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनपासून तब्बू दूरच असल्याचे पाहायला मिळत आहे. तब्बू या चित्रपटाचे प्रमोशन का करत नाही याविषयी तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे. 

भारत या चित्रपटात सलमान खान, कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाचे ते दोघेही गेल्या काही दिवसांपासून चांगलेच प्रमोशन करत आहेत. पण या चित्रपटाचे तब्बू कुठेच प्रमोशन करत नसल्याचे दिसत आहे. याविषयी तब्बूने एका मुलाखतीत सांगितले की, भारत या चित्रपटामध्ये माझी भूमिका खूपच छोटी आहे. या चित्रपटातील केवळ एकाच दृश्यात मी दिसणार आहे. त्यामुळे याबाबत मी काय बोलणार... म्हणूनच मी या चित्रपटाच्या कोणत्याही प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होणार नाहीये. 

भारत या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जाफर करत असून सलमान खानने त्याच्यासोबत याआधी टायगर जिंदा है, सुलतान या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

'भारत' चित्रपटात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. भारताच्या पूर्वजांनी कुठल्या प्रकारच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते आणि आजचा भारत कसा आहे, अशी या चित्रपटाची ढोबळ कथा आहे. या चित्रपटात सलमान वेगवेगळ्या पाच लुकमध्ये दिसणार असून या सगळ्याच लूकची चर्चा सध्या रंगली आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरीना कैफसोबत जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत. ईदच्या मुहूर्तावर 'भारत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.


Web Title: Tabu reveals why she won't be promoting Bharat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.